लातूर जिल्ह्यातील वन अच्छादित क्षेत्र वाढवण्याची अत्यंत गरज – प्रा अनिल चवळे

0
लातूर जिल्ह्यातील वन अच्छादित क्षेत्र वाढवण्याची अत्यंत गरज - प्रा अनिल चवळे

लातूर जिल्ह्यातील वन अच्छादित क्षेत्र वाढवण्याची अत्यंत गरज - प्रा अनिल चवळे

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील यशवंत कनिष्ठ महाविद्यालयात पर्यावरण जनजागृती, जागतिक वसुंधरा दिन आणि जलसंवर्धन सप्ताहानिमित्त विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना प्रा. अनिल चवळे यांनी लातूर जिल्ह्यातील चिंताजनक वन आच्छादनाकडे लक्ष वेधले. त्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील केवळ ०.४८ टक्के जमीन वन अच्छादीत आहे, ज्यामुळे भविष्यात गंभीर पर्यावरणीय समस्या निर्माण होऊ शकतात. या धोक्याची जाणीव करून देत लातूर जिल्ह्यातील वृक्ष लागवड वाढवली पाहिजे व असलेले वन क्षेत्र जपले पाहिजे असे प्रा. चवळे यांनी सांगत वृक्ष लागवड वाढवण्यावर जोर दिला.
यावेळी जलसंधारणाचे महत्त्व विशद करताना प्रा. चवळे म्हणाले की, पाणी अडवणे आणि जिरवणे ही काळाची गरज आहे. यासोबतच प्लास्टिक मुक्ती अभियानाचीही प्रभावी अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंत कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सय्यद एम. यु. होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या महत्त्वावर भर दिला. प्रा. रवी इरफळे यांनीही पर्यावरणासंबंधी महत्त्वपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली.
या कार्यक्रमाचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे विद्यार्थ्यांकडू वृक्ष लागवडी ची शपथ घेतली . येत्या पावसाळ्यात प्रत्येक विद्यार्थ्याने किमान दोन झाडे लावण्याचा संकल्प यावेळी केला. पर्यावरणाबद्दलची ही बांधिलकीनिर्माण होण्याची गरज व्यक्त केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बालाजी कारामुंगीकर यांनी केले. त्यांनी आपल्या प्रभावी शैलीने कार्यक्रमात रंगत भरली. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. शिवशंकर पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
एकंदरीत, यशवंत कनिष्ठ महाविद्यालयातील हा पर्यावरण जनजागृती कार्यक्रम अत्यंत माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी ठरला. विद्यार्थ्यांनी घेतलेली वृक्ष लागवणाची शपथ निश्चितच सकारात्मक बदल घडवणारी ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!