महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालयाच्या उज्वल यशाची परंपरा कायम

महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालयाच्या उज्वल यशाची परंपरा कायम
अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचे मार्फत
फेब्रुवारी/मार्च 2025 मध्ये घेण्यातl आलेल्या एचएससी बोर्ड परीक्षेत महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी घवघवीत यश संपादन केले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे तर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर करण्यात आला आहे.
विज्ञान शाखेचा निकाल
विज्ञान शाखेतून 168 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते त्यामध्ये दोन विद्यार्थी विशेष प्रविण्यसह, आठ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 51 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर 104 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत असे एकूण 165 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेचा शेकडा निकाल 98.21%लागला आहे. महाविद्यालयातून व विज्ञान शाखेतून सर्वप्रथम कुमारी बनसोडे संबोधी गौतम 77.17%, सर्व द्वितीय कुमारी मुळे अंजली बालाजी 76.00% तर सर्व तृतीये कदम संजीवनी ज्ञानेश्वर 71.17% गुण मिळविले आहेत.
कला शाखेचा निकाल-
कला शाखेतून एकूण 64 विद्यार्थी परीक्षेत स्पष्ट झाले होते त्यापैकी 41 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत कला शाखेचा शेकडा निकाल 65 टक्के लागला आहे
कला शाखेतून सर्वप्रथम सपाटे धीरज तानाजी 73.83%, सर्व द्वितीय कवडेकर आरती मुरलीधर 72.50% तर सर्व तृतीय भाले साधना रामदास 68.17% गुण मिळाले आहेत.
एच एस सी होकेशनल (MCVC) विभाग
एमसीव्हीसी विभागातून एकूण 33 विद्यार्थी परीक्षेत स्पष्ट झाले होते. त्यामध्ये प्रथम श्रेणीत 06 व द्वितीय श्रेणीत 21 असे एकूण 27 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एमसीव्हीसी विभागाचा शेकडा निकाल 82 टक्के लागला आहे.
एमसीवीसी विभागातून सर्वप्रथम शेख शमा इसाक 70.67%
सर्व द्वितीय भावे काजल विजय 63.83%
सर्व तृतीय जाधव ज्ञानेश्वरी सूर्यकांत 62.33%
कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष – श्री श्रीरंगराव पाटील साहेब, सचिव -श्री पांडुरंग तुळशीराम शिंदे उपाध्यक्ष श्री महादेवराव पाटील साहेब
प्राचार्य श्री जाधव एस .आर.,उप प्राचार्य श्री बिरादार भगवान, पर्यवेक्षक श्री चाकूरकर पी.बी. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.