अतिक्रमित शेत रस्ते ,पाणंद रस्ते, शिव रस्ते मोकळे करण्यासाठी शेतकऱ्यांनी सस्ती अदालतीमध्ये उपस्थित राहावे – तहसीलदार उज्वला पांगरकर

0
अतिक्रमित शेत रस्ते ,पाणंद रस्ते, शिव रस्ते मोकळे करण्यासाठी शेतकऱ्यांनी सस्ती अदालतीमध्ये उपस्थित राहावे - तहसीलदार उज्वला पांगरकर

अतिक्रमित शेत रस्ते ,पाणंद रस्ते, शिव रस्ते मोकळे करण्यासाठी शेतकऱ्यांनी सस्ती अदालतीमध्ये उपस्थित राहावे - तहसीलदार उज्वला पांगरकर

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील सामान्य शेतक-यांना अतिक्रमित शेत रस्ते पाणंद रस्ते, शिव रस्ते मोकळे करणे कामी जलद न्याय मिळावा व प्रकरणाचा तातडीने निपटारा व्हावा यासाठी महिन्यातील दुसरा व चौथा शुक्रवार पंधरा दिवसातून एकदा एका ठिकाणी शक्यतो तहसिल कार्यालयात किंवा गरजेनुसार मंडळ मुख्यालयाच्या ठिकाणी सस्ती अदालत या नावाने छत्रपती संभाजीनगर विभागातील आठही जिल्ह्यांमध्ये सस्ती अदालत हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

त्याअनुषंगाने तालुक्यातील शेतकऱ्यांचे शेत रस्ते, पांदन रस्ते, शिव रस्ते अतिक्रमित मोकळे करण्यासाठी तहसील कार्यालय, अहमदपूर प्रशासनाच्या वतीने सस्ती अदालत उपक्रमाचे दि ९ मे २०२५ रोजी शुक्रवारी सकाळी १०.०० वाजता मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, २ रा मजला सभागृह, अहमदपूर येथे आयोजन करण्यात आले आहे.

अहमदपूर तालूक्यातील मधील ६ मंडळातंर्गत अतिक्रमित शेतरस्ते,पाणंद रस्ते, शिव रस्ते मोकळे करणे कामी जलद न्याय मिळावा व प्रकरणाचा तातडीने निपटारा व्हावा व सदर अदालती मध्ये संबंधित नागरीक यांचे शेत रस्ता, पाणंद रस्त्यावरील अतिक्रमण काढणे बाबतची सर्व संबधीत शेतकरी यांचे सोबत चर्चा करुन तसेच समुपदेशन करुन सामंजस्याने निकाली काढणे बाबत सदरील दिवशीच्या सस्ती अदालतीमध्ये कार्यवाही करण्यात येणार आहे.

चौकट : –
अहमदपूर तालुक्यातील शेतक-यांना अतिक्रमित शेतरस्ते , पाणंद रस्ते, शिव रस्ते मोकळे करण्यासाठी दि ९ मे २०२५ रोजी शुक्रवारी सकाळी १०.०० वाजता मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, २ रा मजला सभागृह, अहमदपूर येथे सस्ती अदालतीमध्ये उपस्थित राहावे, असे आवाहन उज्वला पांगरकर, तहसीलदार अहमदपूर यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!