पशुवैद्यकाने पशूरोग निदान व उपचारासाठी अद्यावत तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे – डॉ. नितीन पाटील

उदगीर (प्रतिनिधी) पशुवैद्यकीय महाविद्यालय, महाराष्ट्र पशुविज्ञान व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर व पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने उदगीर पशुवैद्यकीय महाविद्यालय येथे पशुसंवर्धन खात्यातील पशुधन विकास अधिकारी यांच्यासाठी सहा दिवसीय तांत्रिक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या निरोप समारंभाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. नितीन पाटील, कुलगुरू,माफसू, नागपूर तसेच डॉ.अनिल भिकाने, संचालक, विस्तार शिक्षण संचालनालय, माफसू, नागपूर यांची प्रमुख उपस्थिती होती, तर अध्यक्षपद डॉ. नंदकुमार गायकवाड, सहयोग अधिष्ठाता पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर यांनी भूषविले.
प्रमुख पाहुणे डॉ. नितीन पाटील बोलत असताना भाषणामध्ये त्यांनी नमूद केले की, पशुधन विकास अधिकाऱ्यांनी अद्यावत तंत्रज्ञानाची माहिती असणे आवश्यक आहे. समाजामध्ये काम करत असताना मानव व प्राणी यांच्यामधील जी रोगांचे संक्रमण आहे, हे रोखण्यासाठी तसेच जनावरांच्या रोगांवर अचूक निदान व उपचार करण्यासाठी स्वतःला नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून घ्यावी, असे हि नमूद केले.
या कार्यक्रमांमध्ये प्रमुख उपस्थिती डॉ. अनिल भिकाने, संचालक, विस्तार शिक्षण, माफसू, नागपूर यांनी पशुवैद्यकांशी संवाद साधला व त्यांना मार्गदर्शन केले.
सदरील तांत्रिक प्रशिक्षणासाठी औरंगाबाद विभाग तसेच लातूर विभागातील एकूण 25 पशुधन विकास अधिकारी उपस्थित होते. या तांत्रिक प्रशिक्षणा अंतर्गत रोग निदानासाठी लागणारे व उपचारासाठी आवश्यक असे अद्यावत तंत्रज्ञान जसे क्ष किरण, सोनोग्राफी, शेळ्या मधील मारतुकीचे प्रमाण कमी करणे, रेबीज वरील अध्यावत उपचार पद्धती, असे एकूण २० मार्गदर्शनपर प्रात्यक्षिके तसेच संवाद आयोजित करण्यात आले होते. उदगीर पशूवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ञ प्राध्यापक डॉ. गोपाल भारकड, डॉ.अ.वि भोसले, डॉ.ए.डी. पाटील, डॉ. प्रशांत मसारे, डॉ. रवी सूर्यवंशी, डॉ. संभाजी चव्हाण, डॉ. सुरेश घोके, डॉ.प्रफुलकुमार पाटील यांनी मार्गदर्शन केले.
तांत्रिक प्रशिक्षणाचे समन्वयक डॉ. अशोक वि. भोसले, प.वै.म., उदगीर यांनी प्रस्ताविक केले सर्वांचे शब्दसुमनाने स्वागत केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. मत्स्यगंधा पाटील व डॉ. विवेक खंडाईत यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉक्टर गोपाल भारकड पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर यांनी केले. हे प्रशिक्षण व निरोप समारंभ कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. संतोष शिंदे (अळेंबिक), डॉ. महेश कुलकर्णी, डॉ. आकांक्षा भालेराव यांनी अथक परिश्रम घेतले.