महिलांचे दागिने चोरणाऱ्या महिला आरोपीला अटक, 5 तोळ्याचे सोन्याचे दागिने जप्त.

0
महिलांचे दागिने चोरणाऱ्या महिला आरोपीला अटक, 5 तोळ्याचे सोन्याचे दागिने जप्त.
 लातूर (एल पी उगिले)         बस मध्ये प्रवास करीत असताना गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र,गंठण चोरणाऱ्या गुन्ह्यातील महिला आरोपीला अटक करण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे. तसेच आरोपीकडून  51.5 ग्राम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी महिलांचे दागिने चोरल्याची 3 गुन्हे उघड झाले आहेत. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेने कामगिरी केली आहे.
  याबाबत थोडक्यात माहिती अशी की, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये घडणाऱ्या चोरी व चैन स्नॅचिंग चे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता आदेशित केले होते. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलीस अधिकारी, अमलदारांचे पथक तयार करण्यात आले होते. सदर पथकामार्फत जिल्ह्यातील विविध गुन्हेगारांची माहिती एकत्र करून त्याचे विश्लेषण करण्यात येत होते. तसेच गोपनीय बातमीदार नेमून त्यांच्याकडून माहिती घेण्यात येत होती.
           दरम्यान 11/05/2025 पोलीस पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून बस मध्ये प्रवास करणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील चोरलेले सोन्याचे दागिने विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिला आरोपीला बसस्थानक क्रमांक 2 च्या परिसरातून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांने सांगितले की, लातूर शहरातील व जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बस स्थानकामध्ये गर्दीचा फायदा घेऊन, बस मधून चढ-उतार करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, गंठण चोरून निघून जाण्याचे गुन्हे केल्याचे कबूल केले.
         त्यावरून लातूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांचे अभिलेखाची माहिती घेतली असता पोलीस ठाणे अहमदपूर येथील दागिने चोरीचे  2 गुन्हे, व पोलीस ठाणे शिवाजीनगर येथील एक गुन्हा असे 3 गुन्हे दाखल असल्याचे दिसून आले आहेत.
        नमूद आरोपींनी वर गुन्ह्यात चोरलेला सोन्याचे 51 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आजच्या बाजार भावाप्रमाणे किंमत एकूण 5,00,000/-रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
            सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अमलदार सूर्यकांत कलमे, योगेश गायकवाड, राजेश कंचे, विनोद चालवाड, तुळशीराम बरुरे, महिला पोलीस अंमलदार चिखलीकर, चालक पोलीस अमलदार प्रदीप चोपणे, चंद्रकांत केंद्रे यांनी केली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!