यशवंत विद्यालयातील 100% गुण घेणाऱ्या 6 गुणवंत विद्यार्थ्यांची आकाशवाणीवर मुलाखत

0
यशवंत विद्यालयातील 100% गुण घेणाऱ्या 6 गुणवंत विद्यार्थ्यांची आकाशवाणीवर मुलाखत

यशवंत विद्यालयातील 100% गुण घेणाऱ्या 6 गुणवंत विद्यार्थ्यांची आकाशवाणीवर मुलाखत

अहमदपूर (गोविंद काळे) : शालांत प्रमाणपत्र परीक्षेत यशवंत विद्यालयातील 6 विद्यार्थी 100 %गुण घेऊन यशवंत विद्यालय अहमदपूर या शाळेचे नाव उंचावले आहे.यामुळे आँल इंडिया रेडिओचे परभणी आकाशवाणी केंद्रावर दि.18 मे रोजी सकाळी 11:35 वाजता बालमंडळ या कार्यक्रमात गुणवंत 06 विद्यार्थ्यांचे मुलाखत संपन्न होणार आहे.
वर्षभर विद्यार्थ्यांने कशा पद्धतीने आभ्यास केला,शाळेतील शिक्षकांचे कशा पद्धतीने मार्गदर्शन लाभले.संस्थेने शाळेच्या उन्नतीसाठी केलेले वार्षिक नियोजन, गुणवंत विद्यार्थ्यांनी केलेली मेहनत अभ्यासासाठी दिलेला वेळ, वेळोवेळी शिक्षकांनी केलेले विषयाचे मार्गदर्शन या सर्व गोष्टीवर विद्यार्थ्यांनी आकाशवाणीवर मुलाखत दिली आहे.मुलाखतीसाठी उपक्रमशील कलाशिक्षक महादेव खळुरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विद्यालयातील १००% गुण घेणारे विद्यार्थी कु.बैकरे साधना गोविंद,कु.दाचावर ज्ञानदा राम,कु.डावळे राही संदिपान,कु.कोपले गायत्री धनंजय,काडवदे ओम गिरीश,
मुंडे साईराज भास्कर यांनी मुलाखत दिली आहे.
आकाशवाणी वर मुलाखत दिलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे टागोर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अशोक सांगवीकर,संस्थेचे सचिव डी बी लोहारे गुरुजी,उपाध्यक्ष डाँ भालचंद्र पैके,सहसचिव डाँ सुनिता चवळे,प्राचार्य गजानन शिंदे, उपमुख्याध्यापक माधव वाघमारे,पर्यवेक्षक रामलिंग तत्तापुरे, शिवाजी सुर्यवंशी,परीक्षा विभाग प्रमुख सुनील धनुरे, गुरप्पा बावगे, क्रीडा शिक्षक संतोष कदम, यांच्यासह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन व कौतुक केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!