सरस्वती माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

0
सरस्वती माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

सरस्वती माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : कुमठा बुद्रुक येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयात फेब्रुवारी मार्च 2025 मध्ये संपन्न झालेल्या एस.एस.सी.बोर्ड माध्यमिक शालांत परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा दिनांक 14 5 2025 रोजी मोठ्या थाटात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक अशोकराव पेदेवाड हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून टागोर शिक्षण समितीच्या सहसचिव डॉक्टर सुनिता ताई चवळे या उपस्थित होत्या. यावर्षीचा दहावीचा निकाल 89.56% लागलेला असून विशेष प्राविण्यश्रेणीत दहा विद्यार्थी आहेत. प्रथम श्रेणीत 33 विद्यार्थी असून द्वितीय श्रेणीत 9 विद्यार्थी आहेत. याप्रसंगी शाळेतून 92 टक्के गुण घेऊन प्रथम येणारी कुमारी दिव्या धोंडीबा पवार, अनिरुद्ध ज्ञानेश्वर पांचाळ 91.20%, अनिकेत विलास सोनकांबळे 86%, वैष्णवी दीपक पवार 82%, या प्रतिभावंतांचा भव्य दिव्य सत्कार डॉक्टर सुनिता ताई चवळे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी शाळेतील पर्यवेक्षक अरुण राठोड, प्राध्यापक बालाजी पटवारी, व्यंकटराव पुठ्ठेवाड, ज्ञानेश्वर जवळे, वरिष्ठ लिपिक जयप्रकाश माने, सुरेश पाटील, विकास मुंडकर, ग्रंथपाल रमेश नीला, विद्यार्थी पालक धोंडीबा पवार, ज्ञानेश्वर पांचाळ, दीपक पवार यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख उमाकांत कांबळे यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!