अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयाच्या ‘चला वाचू या’ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

0
अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयाच्या 'चला वाचू या' उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयाच्या 'चला वाचू या' उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात वाचनसंस्कृतीचे जतन व संवर्धन करून विद्यार्थ्यांचे मन,मनगट आणि मस्तिष्क बळकट करण्याच्या ध्येयाने ५ मे ते १३ जून या कालावधीत तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी ‘चला वाचू या’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सहभागी वाचकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा.परमेश्वर इंगळे यांनी दिली.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालय हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत गुणवत्तेत सातत्य टिकवून अव्वल राहिले आहे. तसेच महाविद्यालयातील वैविध्यपूर्ण अशा अभिनव उपक्रमांचे आयोजन करून संशोधन, वाङमयीन, महिला सबलीकरण, पर्यावरण संवर्धन, राष्ट्रीय एकात्मता, यासह क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करीत आहे.
या वर्षी उन्हाळ्यात मुलांना मोबाईल पासून परावृत करून त्यांची वाचन संस्कृती जोपासून विद्यार्थ्यांचे समृद्ध व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी ग्रंथालयातील अभ्यासाव्यतिरिक्त कथा, कादंब-या , नाटक, चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन या ललित साहित्यसह वैचारिक, ऐतिहासिक, पौराणिक ग्रंथ, अनुवादित साहित्यासह शब्दकोष आणि स्फुट साहित्याचे वाचन करण्यासाठी दि.५मे ते १३ जून याकालावधीत सकाळी १० ते १ या वेळेत रविवार व सुट्टीचे दिवस वगळता महाविद्यालयाच्या ग्रंथालयात मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याच अनुषंगाने आज पहिल्याच दिवशी अहमदपूर शहरातील तथा तालुक्यातील वाचन प्रेमी विद्यार्थी पालक व नागरिकांनी सहभाग नोंदवून प्रचंड प्रतिसाद दिला.
विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून फिल्टरयुक्त थंड पाणी तसेच इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.या ‘चला वाचू या’ या उपक्रमात सहभागी होणा-या विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयाचे ओळखपत्र सादर करणं बंधनकारक आहे. याचा अहमदपूर व परिसरातील विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील व ग्रंथपाल प्रा.परमेश्वर इंगळे यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!