महात्मा फुले महाविद्यालय छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन

0
महात्मा फुले महाविद्यालय छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन

महात्मा फुले महाविद्यालय छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात बहुभाषा विद्वान, प्रकांड पंडित, तत्ववेत्ता, शूर लढवय्या, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करून त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, मराठी साहित्या चे ज्येष्ठ समीक्षक तथा लेखक प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती’ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. प्रो. डॉ.अनिल मुंढे होते तर गोविंदराव श्रीमंगले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपप्रसंगी प्रो. डॉ. अनिल मुंढे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन व कार्यावर यथोचित मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. सतीश ससाणे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!