किलबिल ची CBSE बोर्ड परीक्षेच्या उज्वल निकालाची परंपरा कायम

0
किलबिल ची CBSE बोर्ड परीक्षेच्या उज्वल निकालाची परंपरा कायम

किलबिल ची CBSE बोर्ड परीक्षेच्या उज्वल निकालाची परंपरा कायम

अहमदपूर (गोविंद काळे) : नुकताच CBSE बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून, त्यामध्ये शाळेची गुणवंत विद्यार्थिनी
कु.अदिती लक्ष्मण चोले 98.44 गुण घेऊन शाळेतून सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. तर कुमठेकर अबूजर बशीर या विद्यार्थाने 97 टक्के गुण घेऊन द्वितीय तर अभिषेक विजय अंभुरे 96 टक्के गुण घेऊन सर्व तृतीय व त्याचबरोबर सय्यद रूशदा फारुकली 95.60 टक्के गुण घेऊन चौथी तर देशमुख हर्षदा अमोल 95.20 टक्के गुणासह पाचव्या क्रमांक पटकावत घवघवीत यश संपादित केले.
शाळेचे एकूण 72 विद्यार्थी विशेष प्राविण्यसह गुण मिळवून मोठे यश संपादित केले आहे.सदरील बोर्ड परीक्षेमध्ये शाळेचे एकूण 100 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना परवेज शेख, श्रीधर आडिके राजेंद्र परगे, बालाजी भोगे, प्रकाश कांबळे,आशिष देशमुख , श्रीकांत वलांडे, रोमिओ चौगलोई ओमकार पोहरे, प्रतिभा सूर्यवंशी आदी तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
त्याबद्दल सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले, प्राचार्य संतोष पाटील, उपप्राचार्य धरमसिंग शिराळे , समन्वयक लक्ष्मण थोटे आदी मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!