एस. ए. जागीरदार हायस्कूल, कालेगावचा दहावीचा घवघवीत यश: ९५% निकाल, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान!
अहमदपुर (गोविंद काळे) : तालुक्यातील ख्याती प्राप्त एस. ए. जागीरदार हायस्कूल, कालेगाव या शाळेने यंदा दहावीच्या परीक्षेत उत्तुंग यश संपादन करत गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत शाळेचा एकूण निकाल ९५% लागला आहे.
या वर्षी एकूण २० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, त्यापैकी १९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर एक विद्यार्थ्याला ATKT मिळाले आहे. ही शाळा ग्रामीण भागातील असूनही इथे मिळालेलं यश हे शाळेतील गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिक्षकांचा मेहनतीचा पवित्र ध्यास आणि विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण अभ्यासाचे फलित आहे
गुणवंत विद्यार्थ्यांचा ठसा!
गुणवंत विद्यार्थ्यांनी घवघवीत गुण मिळवून शाळेचे नाव उज्वल केले आहे:
शेख तहुरा कलीम साब – ७८.६०%
सय्यद रिमशा महेरीन अली साब – ७५.४०%
शेख फतेमा ताजुद्दिन साब – ७३.२०%
निकालाचा तपशील:
विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थी – ०३
प्रथम श्रेणी – ०६
द्वितीय श्रेणी – ०६
तृतीय श्रेणी – ०४
हे यश केवळ विद्यार्थ्यांचे नाही, तर शाळा व्यवस्थापन, शिक्षकवृंद, पालकवर्ग आणि संस्थेच्या दूरदृष्टीचा सामूहिक विजय आहे. अभिनंदनाचा वर्षाव या यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे संस्था अध्यक्ष अब्दुल मुजीब पटेल साहेब, संस्था सचिव जागीरदार अब्दुल शुकुर साहेब, शाळा व्यवस्था समिती अध्यक्ष हाफीज अब्दुल लतिफ साहेब, मुख्याध्यापक हबीब अबुबकर महेसन आणि सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांनी विशेष कौतुक करत अभिनंदन केले. त्याचप्रमाणे, विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत, शाळेने गुणवत्तेच्या वाटेवर नव्या उंचीची दिशा पकडली आहे, असे सर्वत्र गौरवाने बोलले जात आहे.