शालांत प्रमाणपत्र परीक्षेत यशवंत विद्यालयाचे 100% चे सहा विद्यार्थी 90% पेक्षा जास्त गुण घेणारे 119 विद्यार्थी

शालांत प्रमाणपत्र परीक्षेत यशवंत विद्यालयाचे 100% चे सहा विद्यार्थी 90% पेक्षा जास्त गुण घेणारे 119 विद्यार्थी
अहमदपूर (गोविंद काळे) : मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला असून त्यात यशवंत विद्यालयाचे सहा विद्यार्थी 100 टक्के गुण घेतलेले असून नेत्र दीपक यशाची परंपरा त्याने कायम केलेली आहे.
यशवंत विद्यालयाचे 100% चे सहा विद्यार्थी त्यात कुमारी साधना गोविंद बैकरे, कुमारी ज्ञानदा राम दाचावार , कुमारी राही संदिपान डावळे, कुमारी गायत्री धनंजय कोपले , ओम गिरीश काडवादे, साईराज भास्कर मुंडे असून 95 टक्के पेक्षा जास्त गुण घेणारे विद्यार्थी 55 असून 90% पेक्षा जास्त गुण घेणारे विद्यार्थी 119 आहेत.
शाळेचे विशेष प्राविण्य विद्यार्थी 315,प्रथम श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थी 160 , द्वितीय श्रेणीतील उत्तीर्ण विद्यार्थी 62, तृतीय श्रेणीतील उत्तीर्ण विद्यार्थी 10 आहेत. शाळेत एकूण 552 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते शाळेचा शेकडा निकाल विक्रमी असा 99.09 आहे.
या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे सचिव शिक्षण महर्षी डी बी लोहारे गुरुजी, संस्थेच्या सहसचिव प्रा. डॉ. सुनिता चवळे यांच्या हस्ते करण्यात आला.
या नेत्रदीपक यशाबद्दल टागोर शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉक्टर अशोकराव सांगवीकर,सचिव शिक्षण महर्षी डी बी लोहारे गुरुजी, उपाध्यक्ष डॉ.भालचंद्र पैके, सहसचिव प्रा. डॉ. सुनिता चवळे, मुख्याध्यापक गजानन शिंदे, उप मुख्याध्यापक माधव वाघमारे, पर्यवेक्षक राम तत्तापुरे, शिवाजी सूर्यवंशी यांच्या सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.