सर्जेराव भांगे यांच्या सकारात्मक राजकारणाचा विजय -शिवाजी साखरे (वाघ)

0
सर्जेराव भांगे यांच्या सकारात्मक राजकारणाचा विजय -शिवाजी साखरे (वाघ)

उदगीर (एल.पी. उगिले) : उदगीर तालुका जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकांमध्ये सत्यम् शिवम् सुंदरम् पॅनलचे प्रमुख भांगे सर्जेराव शंकरराव यांनी सर्वाधिक मते घेत आपल्या पॅनलच्या बारा सदस्यांना विजयश्री मिळवून दिली आहे. मागील कार्यकाळात सर्जेराव भांगे यांनी केलेल्या सकारात्मक आणि विकासात्मक कामाची पावती म्हणून सुज्ञ मतदारांनी मोठ्या मताधिक्याने पुन्हा त्यांच्याच हातात संस्था सोपवली आहे. असे विचार शिक्षक संघटनेचे नेते शिवाजीराव साखरे (वाघ) यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, मागील निवडणुकांच्या वेळी आम्ही सर्जेरावांच्या विरोधात होतो. मात्र सध्या सर्जेरावांनी केलेल्या कामाची दखल म्हणून संस्थेच्या हिताचा विचार करून सर्जेराव भांगे यांच्यासोबत काम करायचे ठरवले. शिक्षक सभासदांना या पतसंस्थेच्या विकासात्मक वाटचालीची माहिती दिली.

सर्जेराव भांगे यांच्या सकारात्मक राजकारणाचा विजय -शिवाजी साखरे (वाघ)

सभासदांनी अभ्यासपूर्वक अवलोकन करून आमच्या म्हणण्याला मान देत सत्यम् शिवम् सुंदरम् पॅनलच्या बारा संचालकांना प्रचंड बहुमताने विजयी केले. तीन संचालकांचा निसटता पराभव झाला. निवडणुका होईपर्यंत आम्ही राजकीय मतभेद ठेवले होते. मात्र आता निवडणुका संपल्या आहेत. आता फक्त संस्थाहित डोळ्यासमोर ठेवून सर्जेराव भांगे यांचे सर्व संचालक काम करतील. असा विश्वासही याप्रसंगी शिवाजीराव साखरे (वाघ) यांनी व्यक्त केला आहे. या पंचवार्षिक निवडणुकांमध्ये सर्वसाधारण गटातून भांगे सर्जेराव शंकरराव (577), इरकर शिवाजी नारायणराव (456), नंदकिशोर विश्वनाथ काळे (440), गारमपल्ले बालाजी वैजनाथ (514), बिरादार अरुण शिवाजीराव (480), बिरादार धनराज बाबुराव (474), शिंदे मीनाक्षी केशवराव (465) हे आठ संचालक सत्यम् शिवम् सुंदरम् पॅनलचे असून या सर्वसाधारण गटातून प्रतिस्पर्धी पॅनल मधून पुंड भरत यादवराव (492) आणि म्हेत्रे मनोज कुमार बापूराव (439) हे दोघे विजयी झाले आहेत. महिला प्रतिनिधी गटातून शृंगारे सरिता श्रीपतराव (469) आणि सोनटक्के ज्योतीप्रभा किसनराव (494) या दोन्ही सत्यम् शिवम् सुंदरम् पॅनलच्या संचालक म्हणून विजयी झाल्या आहेत. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती गटातून सत्यम् शिवम् सुंदरम् पॅनलचे मारुती लांडगे यांनी (480) मते घेऊन विजयश्री खेचून आणली आहे. तसेच इतर मागास प्रवर्गातून पंढरीनाथ टेकले यांनी (469) मतदान घेऊन विजयश्री मिळवली आहे. विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातून प्रतिस्पर्धी पॅनल मधून मुंडे मनोज कुमार यांनी (472) मतदान घेऊन विजयश्री मिळवली आहे. एकूण 15 संचालक असलेल्या या पतसंस्थेमध्ये 12 विरुद्ध 3 अशा पद्धतीची सध्याची स्थिती आहे. सहकारी क्षेत्रातील एक मोठी पतसंस्था असलेल्या उदगीर तालुका जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेवर सर्जेराव भांगे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. उदगीर, देवणी, जळकोट या तीन तालुक्यांमध्ये मतदार विभागलेले आहेत. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत सर्जेराव भांगे यांनी विजयश्री खेचून आणली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!