निस्वार्थ सेवाभावी संस्थेमार्फत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

उदगीर (एल पी उगिले) येथील निस्वार्थ सेवाभावी संस्थे मार्फत २०२४–२०२५ दहावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उदय नगर नांदेड नाका उदगीर येथे नुकताच करण्यात आला. या वेळी गुणवंत विद्यार्थिनी ऋतुजा मलशेटटे, आर्या मोरे, तसेच यशस्वी मुंढे ,सुशेन हुडगे, कृष्णा पवार, मल्हार खेडकर, साईरुद्र केंद्रे, या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.या वेळी सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी संस्थेच्या अध्यक्षा ज्योती डोळे, उपाध्यक्ष शिल्पा मलशेटटे,सदस्य जयश्री हरकरे, शकुंतला उतकर यांनी हार्दिक अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.