कोरोना रुग्णसंख्येत वाढ, पुण्यातही सापडला रुग्ण; घाबरू नका दक्ष रहा – डॉ. तेलगाने

उदगीर (एल पी उगिले) महाराष्ट्र मध्ये
मुंबई पाठोपाठ पुण्यातही कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. पुण्यातील 87 वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाली आहे. यंदाच्या वर्षातील पुण्यातील हा पहिलाच रुग्ण असल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. प्रसिद्धी माध्यमातून या संदर्भात बातम्या प्रकाशित होत आहेत, असे असले तरीही नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन ख्यातनाम ओम हॉस्पिटल अँड मॅटरनिटी होमचे प्रमुख, प्रबोधनात्मक कीर्तनकार तथा महिला रोग तज्ञ डॉक्टर शरदकुमार तेलगाने यांनी केले आहे.
कोरोनाचे मुंबईत 56 रुग्ण सक्रिय आहेत. हे सर्व रुग्ण मुंबई महापालिके च्या हद्दीतील आहेत, तर राज्यातील इतर जिल्ह्यांपैकी केवळ पुण्यात नव्याने रुग्ण आढळून आला आहे.
मे महिन्यात रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.या वर्षी जानेवारीपासून आतापर्यंत कोरोनाचे 87 रुग्ण आढळले होते. 87 रुग्णांपैकी 31 बरे झाल्याने सध्या 56 जणांवर घरीच उपचार सुरू आहेत. महाराष्ट्रात सध्या 57 रुग्ण सक्रिय असून, यापैकी केवळ एक रुग्ण पुण्यात असून उर्वरित सर्व रुग्ण राजधानी मुंबईत आहेत. मे महिन्यात रुग्णांमध्ये वाढ झाली आहे, असे आरोग्य खात्याने स्पष्ट केले आहे.
त्यामुळे कोणीही घाबरून जाण्याचे कारण नाही असेही डॉ. शरदकुमार तेलगाने यांनी सांगितले आहे.
कोरोना विषाणू सध्याचा सौम्य स्वरूपाचा उपप्रकार असल्याने घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचेही म्हणणे आहे.
या वर्षी कोरोनाने एकाही रुग्णाचा मृत्यू नाही.आरोग्य विभागाने सोमवारी 46 चाचण्या केल्या. त्यापैकी आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या 15 होती, तर रॅपिड चाचण्यांची संख्या 31 होती. या वर्षी कोरोनाने एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे घाबरून न जाता दक्ष राहणे गरजेचे आहे. असेही डॉ. तेलगाणे यांचे म्हणणे आहे.