सोमनाथपूर येथे कंदुरी च्या मटणातून 11 जणांना विष बाधा

उदगीर (एल पी उगिले) उदगीर तालुक्यातील सोमनाथपूर येथे परमेश्वर रावसाहेब आडे यांच्या घरी बुधवारी (दिनांक 21) दुपारी कंदुरीचा कार्यक्रम होता. कंदुरीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रसाद म्हणून दिलेले मटन खाल्ल्याने अकरा जणांना मळमळ होऊन उलट्या सुरू झाल्या. त्यांना तात्काळ उदगीर येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय सूत्रांनी अन्न विष बाधा झाल्याचे सांगितले.
यासंदर्भात पूजा रामेश्वर आडे, परमेश्वर आडे, हरिबा रतन जाधव, लक्ष्मण नामदेव राठोड, बालाजी खुशाल जाधव, रामेश्वर बालाजी पवार, प्रकाश सोमला पवार, पारूबाई बालाजी पवार, कविता प्रकाश पवार, मनीषा किशोर पाटील, विमलबाई काशिनाथ कांबळे यांना सामान्य रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय सूत्रानुसार सर्वांची प्रकृती स्थिर असून कोणाच्याही जिविताला धोका नसल्याचे सांगितले आहे.