जनता विकास परिषदेमार्फत शेतकरी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

उदगीर (एल पी उगिले) : मराठवाडा जनता विकास परिषद छत्रपती संभाजी नगर विभागाच्या उदगीर शाखेच्या वतीने आजच्या शेतकऱ्यांचा जीवनक्रम विचारात घेऊन, निसर्ग, बाजारपेठ, शासकीय धोरण या संदर्भाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शेतकरी मार्गदर्शन शिबिराच्या आयोजन करण्यात आले आहे. वस्त्रोद्योग महामंडळ महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न होणार आहे. तसेच उदगीर येथील उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांनी आपल्या कर्तव्यनिष्ठेने मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या 100 दिवस कृती आराखड्याच्या कार्यक्रमात विभागातून दुसरा क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांचा आणि उदगीर पंचक्रोशीतील नामवंत शेतकऱ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजनही या शिबिरात करण्यात आले आहे. 26 मे 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता उदयगिरी लायन्स धर्मादाय नेत्र रुग्णालयाच्या सभागृहामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी जास्तीत जास्त जाणकारांनी उपस्थित राहावे. असे आवाहन मराठवाडा जनता विकास परिषदेचे शाखा अध्यक्ष समाजसेवक डॉ. आर. एन. लखोटिया, सचिव एस एस पाटील, उपाध्यक्ष दत्ता पाटील, कोषाध्यक्ष महादेव खताळ यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी केले आहे.