लातूर जिल्हा माहिती कार्यालय राज्यात पहिले

0
लातूर जिल्हा माहिती कार्यालय राज्यात पहिले

लातूर (एल पी उगिले) : १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांच्या विशेष मोहीमेंतर्गत सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या राज्यातील महाराष्ट्र राज्य माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक (माहिती) जिल्हास्तरावर लातूर जिल्हा माहिती कार्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांच्या विशेष मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत राज्याच्या सर्व महसुली विभागस्तरीय आणि जिल्हास्तरीय कार्यालयांच्या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यात लातूर जिल्हा माहिती कार्यालय राज्यात पहिले आल्याबद्दल लातूर विभागीय माहिती कार्यालयाच्या संचालक डॉ. सुरेखा मुळे यांच्या उपस्थितीत लातूर जिल्हा माहिती अधिकारी तानाजी घोलप यांचा व कार्यालयातील जेष्ठ लिपीक विवेक डावरे, दिलीप वाठोरे, अहमद बेग, फोटोग्राफर अमोल घायाळ यांचा दत्तात्रय परळकर, रविकिरण सुर्यवंशी व संजीव पाटील यांच्या वतीने आज सत्कार करण्यात आला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!