लातूर जिल्हा माहेश्वरी सभेचा महेश गौरव पुरस्कार श्रीनिवास सोनी यांना घोषित

0
लातूर जिल्हा माहेश्वरी सभेचा महेश गौरव पुरस्कार श्रीनिवास सोनी यांना घोषित

उदगीर (एल पी उगिले) : उदगीर तालुका माहेश्वरी सभेचे अध्यक्ष तथा उदगीर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष श्रीनिवास सोनी यांना मानाचा समजला जाणारा लातूर जिल्हा माहेश्वरी सभेचा महेश गौरव पुरस्कार घोषित झाला आहे. हा पुरस्कार 5 जून 2025 रोजी लातूर येथे मोठ्या थाटात दिला जाणार असल्याचे जिल्हा सभेचे सचिव फुलचंद काबरा यांनी सांगितले आहे.लातूर जिल्हा माहेश्वरी सभे तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठित महेश गौरव पुरस्कार या वर्षी उदगीर तालुका माहेश्वरी सभे चे अध्यक्ष श्रीनिवास मदनलाल सोनी यांना घोषित झाला असून हा पुरस्कार मारवाडी समाजासाठी विशेष काम करणाऱ्या व्यक्तीस देण्यात येतो, श्रीनिवास सोनी यांनी येथील मारवाडी समाजाच्या स्मशानभूमी साठी शासनाकडून 10 गुंठे जागा सह स्मशानभूमी विकासासाठी 30 लाख रुपयाचा निधी ही आ. संजय बनसोडे यांच्या कडून उपलब्ध करून घेतला, तसेच मारवाडी समाजातील गरीब कुटुंबास मुख्यमंत्री सहायता निधी मिळवून देणे,समाजासाठी विविध योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करणे,अशा अनेक समाजोपयोगी कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना घोषित करण्यात आल्याचे लातूर जिल्हा माहेश्वरी सभेचे सचिव फुलचंद काबरा यांनी सांगितले आहे, हा पुरस्कार श्रीनिवास सोनी यांना घोषित झाल्याबद्दल लातूर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष प्रकाश कासट, उदगीर येथील प्रसिद्ध समाजसेवक डॉ. रामप्रसाद लखोटिया, ईश्वरप्रसाद बाहेती, गोविंदलाल राठी,कैलास बियाणी, अशोक बाहेती , जगदीश बागडी, रामविलास नावंदर,उदगीर तालुका माहेश्वरी सभेचे सचिव राजगोपाल मणियार,आनंद बजाज, डॉ प्रवीण मुंदडा,राधेश्याम इनानी, द्वारकादास भुतडा,शिरीष नावंदर, राजेश सारडा ,सत्यनारायण सोमाणी, गणेश बजाज,मारवाडी युवा मंच अध्यक्ष गोविंद मुंदडा,लक्ष्मीकांत सोमाणी,पवन मुंदडा सह सर्व समाज प्रेमीनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!