छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना कठोर शिक्षा करा – मागणी
उदगीर (एल पी उगिले) : मौजे कोणाळी तालुका देवणी येथे काही समाज कंटाकांनी जाणून बुजून छत्रपती शिवाजी महाराज चौकात टोळक्याने जमून पुतळ्यावर निळा झेंडा लावत, पुतळ्याला चपलेने मारत तथा काही तरुण जमिनीवरील दगड घेऊन पुतळ्यावर भिरकावली व सामाजिक एकात्मतेला छेद देण्याचा जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सदरील घटना निंदनीय असून शिवप्रेमींच्या भावना दुखावणारी आहे,ज्या शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदारांना, बहुजनांना मावळ्यांना एकत्रित करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, जगाला सामाजिक समतेचा संदेश दिला. अशा महान राजांच्या बद्दल घडलेल्या घटनेचा परिसरातून तीव्र प्रतिक्रिया उद्भवत आहेत, परिसरात भीतीचे, दहशतीचे वातावरण आहे, सदर घटनेतील सर्वच सहभागी समाजकंटकांवर तत्काळ गुन्हे दाखल करून अटक करावी. अन्यथा सर्व लातूर जिल्हा व राज्यभर जनआंदोलन उभे राहील. असा इशारा शिवप्रेमींनी उदगीर शहर पोलिस स्टेशन येथे एका निवेदना द्वारे देण्यात आला आहे.या वेळी सतीश पाटील मानकीकर, प्रदीप पाटील येणकी, प्रा राहुल अतनुरे, प्रदीप सूर्यवंशी ,केशव सूर्यवंशी, प्रा.मदन पाटील, सतिश आर पाटील, दत्ता पाटील छावा, कांबळे प्रतीक, नितीन बिरादार, सचिन पाटील दापकेकर, रणजीत माळेगाव, भोसले प्रवीण ,संदीप पाटील , पिंटू बिरादार ,सतीश पाटील हिपळणारी, सुनील वाघमारे, विजय पाटील, राजकुमार माने संभाजी ब्रिगेड, गिरीश सूर्यवंशी, प्रशांत जगताप,गिरीश सूर्यवंशी, परदीप बिरादार, विशाल दाडगे, बाजीराव पाटोदे, ऋषिकेश पाटील, दीपक मोरे, मनोहर पाटील, विकास भांडे, आशिष हुरुसनाळे इत्यादी शिवप्रेमी उपस्थित होते.
