रामेश्वर बिरादार यांची शिवसेना ग्रंथालय सेलच्या जिल्हाध्यक्षपदी निवड

उदगीर (एल पी उगिले) : सार्वजनिक ग्रंथालयाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शिवसेना राज्य ग्रंथालय सेल प्रयत्नशील असून, नुकतीच या विभागाच्या पदाधिकाऱ्यांची फेरनिवड करण्यात आली आहे. उदगीर, देवणी आणि जळकोट या तीन तालुक्यात ग्रंथालय चळवळीच्या माध्यमातून कार्य करणारे रामेश्वर बिरादार नागराळकर यांची निवड शिवसेना राज्य ग्रंथालय सेलच्या लातूर जिल्हा अध्यक्षपदी करण्यात आल्याची घोषणा राज्य अध्यक्ष बी.जी. देशमुख यांनी नियुक्तीपत्रद्वारे केली आहे.सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचारी आणि चळवळीतील कार्यकर्ते हे सामाजिक जाणीव जपण्यासाठी आणि वाचन चळवळ जिवंत ठेवून समाजसेवा करण्याच्या भूमिकेतून तुटपुंजा मानधनावर काम करतात. अर्थात एका दृष्टीने 80 टक्के समाजकारण आणि 20% राजकारण या शिवसेनेच्या भूमिकेतूनच हे सर्वजण काम करतात. हे विचारात घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी गाव पातळीवर ग्रंथालय चळवळीला गती देण्यासाठी शिवसेनेची ग्रंथालय सेल सक्रिय करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालवले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आपण ग्रंथालय चळवळीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन सदरील नियुक्तिपत्रात करण्यात आले आहे. आपापल्या विभागात आपण सक्रिय होऊन शिवसेना संघटन बांधणीसाठी प्रयत्न करावेत, जेणेकरून ग्रंथालय चळवळीला ही न्याय मिळेल. अशी अपेक्षा बी.जी. देशमुख यांनी व्यक्त केली आहे. संघटन कुशल असलेल्या रामेश्वर बिरादार नागराळकर यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.