शिवसेनेच्या वतीने ही पुतळा विडंबनाचा निषेध

उदगीर (एल पी उगिले) : शिवसेना उदगीर च्या वतीने देवणी तालुक्यातील कोनाळी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान केल्या प्रकरणी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन आरोपींना कठोर शिक्षा व्हावी. अशी मागणी केली आहे. देवणी तालुक्यातील मौजे कोणाळी येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच विटंबना करणाऱ्या हरामखोरानां रस्त्यात फाशी द्या,तरच पुन्हा अशी घटना घडणार नाही.त्यांना मदत करणाऱ्या आरोपीनाही सह आरोपी करावे, कठोर कार्यवाही करून मोक्का लावून कायमचा बंदोबस्त करावे, आणि पोलीस प्रशासनांनी शिवप्रेमींचा अंत पाहू नये लवकर कार्यवाही करावी. अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.असे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी ॲड. ब्रम्हाजी केंद्रे जिल्हाप्रमुख, माजी तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, माजी शहर प्रमुख अनिल पंचाक्षरी ,अरुणाताई लेंडाणे महिला आघाडी नेत्या,प्रशांत ममदापुरे युवासेना शहरप्रमुख, ॲड. रामदास काकडे उपतालुकप्रमुख, ॲड. विंष्णू चिंतालवार,श्याम तवर,बालाजी भंडे, ओम दादापुरे,गुणवंत वाडकर,मुनाफ पठाण,प्रदिप माधळे,सूर्यकांत कांबळे, गौतम कांबळे,सुनील यादव,भीमराव कांबळे,सखाराम गुराळे,महादेव दुळगे, वैशाली गोटमुकले,सरोजा बिरादार आदी शिवसैनिक उपस्थित होते.