मलकापूरच्या वैष्णवी पवारने आंतरराष्ट्रीय स्तरावर पटकावले एक सुवर्ण आणि एक रोप्य पदक

उदगीर (एल पी उगिले ) : तालुक्यातील मौजे मलकापूर येथील धनुर्विद्या खेळाडू वैष्णवी पवार हिचा भारतीय संघामध्ये समावेश होता. तिने भारताचे प्रतिनिधित्व करत उझबेकिस्तान येथे पार पडलेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये अचूक निशाणा साधून एक सुवर्णपदक आणि एक रौप्य पदक पटकावले. उझबेकिस्तान येथे होणाऱ्या वरिष्ठ गटातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारतीय संघाला मागील दोन स्पर्धेमध्ये एकही मेडल घेता आले नव्हते, मात्र या स्पर्धेमध्ये वैष्णवी ने या दोन पदकाची कमाई करत भारतीय संघाचे पदक खाते उघडले .या स्पर्धेमध्ये 15 देशातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता त्यामध्ये भारतीय संघामध्ये वैष्णवी चाही समावेश होता. हे यश साध्य करण्यासाठी वैष्णवीला प्रशिक्षक सुधीर पाटील ,सुषमा पवार, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक रंजीत चामले यांनी मार्गदर्शन केले .या यशाचे लातूर जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष सुनील साखरे, सचिव अशोक जंगमे,सहसचिव राजेश देवकर,नवनाथ गरगटे ,हनुमंत केसरे,क्रीडा प्रेमी भास्कर पाटील ,गजानन पवार ,उमाकांत भेदे, यमुनाजी भुजबळे ,जिलानी शेख ,खलीखान पठाण ,महेंद्र बिरादार यांनी शुभेच्छा दिल्या व कौतुक केले. या स्पर्धेमध्ये वैष्णवी ने स्कोरिंग राउंड मध्ये 641 स्कोर करित अव्वल स्थान प्राप्त केली. सांखिक प्रकारामध्ये सुवर्णपदक आणि मिश्र प्रकारामध्ये रोप्य पदक प्राप्त केले.