हज चे यात्रेकरू हकीम साहब यांचा ज्येष्ठ नागरिक संघाकडून सत्कार

0
हज चे यात्रेकरू हकीम साहब यांचा ज्येष्ठ नागरिक संघाकडून सत्कार

उदगीर (प्रतिनिधी) : येथील ज्येष्ठ नागरिक संघ कार्यकारीणी सदस्य हकीम साहब हे हज यात्रेकरिता 25 मे रोजी प्रस्थान करीत आहेत. ज्येष्ठ नागरिक संघातर्फे त्यांचा हृदयसत्कार करण्यात आला. हज यात्रेसाठी त्यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रा. रमाकांत मध्वरे, उपाध्यक्ष दीपक बलसूरकर, सचिव मूरलीधर जाधव, कोषाध्यक्ष विश्वनाथराव माळेवाडीकर, संयुक्त सचिव प्रा.श्रीराम चामले,अनिल पत्तेवार, धनराज बिरादार, सौ.चंद्रकला बिरादार, सौ अंजली मध्वरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.ज्येष्ठ नागरिक संघ आपला परिवार असल्यासारखा वाटतो. ज्या आत्मीयतेने आणि आपुलकीने ज्येष्ठ नागरिक संघाने आपल्याला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आपण ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्यांचे ऋण व्यक्त करतो, अशा शब्दात हकीम यांनी आभार व्यक्त केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!