गहीनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते मुख्याध्यापिका सौ.सोमवंशी के.आर.याना राजस्तरीय पुरस्कार

उदगीर (प्रतिनिधी) : नरसिंह विद्यालय गुरदाळ शाळेच्या मुख्याध्यापिका सोमवंशी के.आर.याना या वर्षीचा मानव विकास राजस्तरिय पुरस्कार गहीनीनाथ महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील,खा.डॉ.शिवाजीराव काळगे तसेच आ.संभाजी पाटील निलंगेकर, वसंत घोगरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल मुख्याध्यापिका सोमवंशी के आर यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. अत्यंत प्रतिष्ठेचा असा हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते त्यांना मिळाल्यामुळे शाळेतील सहशिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे.