चार वर्षीय चिमुरडीला ट्रॅक्टरने चिरडले, चालक फरार

0
चार वर्षीय चिमुरडीला ट्रॅक्टरने चिरडले, चालक फरार

उदगीर (प्रतिनिधी) : तालुक्यातील मौजे आवलकोंडा येथे गावातून मातीची वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरने चार वर्षीय चिमुकलेला चिडल्याची घटना घडली आहे. या घटनेत चार वर्षे चिमुकलीचा मृत्यू झाल्याने अवलकोंडा गावासह परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. ट्रॅक्टर चालक हा फरार झाला असून गावावर शोक कळा पसरली आहे. मयत चिमुरडीच्या आईच्या आक्रोशाने गावात आणि परिसरात दुःखाची छाया पसरली आहे, गावात आपल्या घरासमोरील अंगणात खेळत असलेल्या चार वर्षीय शिवकन्या दत्ता खेडकर हिला चिरडून ट्रॅक्टर चालक फरार झाला आहे. गावातील गल्लीमधील एका छोट्याशा रस्त्यावरून गतीने जाणाऱ्या ट्रॅक्टरने हायगईने ट्रॅक्टर चालवल्यामुळे हा अपघात घडल्याचे लोक सांगत आहेत. सदरील ट्रॅक्टरचा चालक अब्रार गौस बागवान असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेच्या संदर्भात पोलिसांना माहिती दिल्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. मात्र दरम्यानच्या काळात तडजोड करण्याच्या प्रयत्नात असल्याचे कळाल्यामुळे पोलीस प्रशासनही थंडावले होते. दरम्यान प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनी सदरील दुर्घटनेचे व्हिडिओ आणि फोटो समाज माध्यमावर प्रसारित केल्यामुळे पोलीस प्रशासनाला हस्तक्षेप करणे भाग पडले, आणि उदगीर ग्रामीण पोलिसांनी मयत झालेल्या चिमूरडीचे शव उदगीर येथील शासकीय रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. सदरील ट्रॅक्टर वर ट्रॅक्टरचा किंवा ट्रॉली चा नंबर नसल्याची चर्चा रंगत आहे, तसेच सदरील ट्रॅक्टरचे इन्शुरन्स देखील संपल्याचे गावामध्ये चर्चिले जात होते. पोलिसांच्या दिरंगाईमुळे आरोपीला फरार होण्यास वेळ मिळाल्याची चर्चा गावांमध्ये चालू होती. बिना नंबरच्या गाड्या बिनधास्तपणे उदगीर ग्रामीण हद्दीमध्ये आणि शहरांमध्ये वावरू लागल्या आहेत, याबद्दलही जनतेने चीड व्यक्त केली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!