महेंद्र बिरादार यांचा वाडीकर ज्वेलर्स च्या वतीने सत्कार

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील वाडीकर ज्वेलर्स यांच्याकडून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य करत सीबीएससी बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेतील गुणवंताचे कौतुक करत, तुमचा सत्कार करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. महेंद्र संजीवकुमार बिरादार हा विद्यार्थी पोस्ते पोद्दार लर्न स्कूल उदगीर येथून सीबीएससी च्या बोर्ड परीक्षेत ९८.६० % गुण मिळवून शाळेतून प्रथम क्रमांक मिळवला. त्याच्या या यशाबद्दल वाडीकर ज्वेलर्स यांच्या वतीने शाल ,पुष्पहार व सन्मान चिन्ह देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. महेंद्र हा लहानपणापासूनच अतिशय अभ्यासू, कुशाग्र बुद्धिमत्तेचा विद्यार्थी असून तो खूप एकाग्रतेने अभ्यास करत असतो. त्याच्या या यशामागे निश्चित त्याच्या आई-वडिलांच्या मेहनतीचाही मोठा वाटा आहे. यावेळी वाडीकर ज्वेलर्सचे प्रो.प्रा. अंगद वाडीकर, अंकुश वाडीकर, संजीवकुमार बिरादार, अरविंद बिरादार, सिध्देश्वर लांडगे, इ, मान्यवर उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी जिद्द आणि चिकाटी ठेवून अभ्यास केल्यास यश निश्चित मिळते असे विचार अंकुश वाडीकर यांनी याप्रसंगी व्यक्त केले तसेच सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांचा आदर्श इतर विद्यार्थ्यांनी घ्यावा. असे आवाहनही केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन वाडीकर ज्वेलर्सचे अंगद वाडेकर यांनी केले.