वर्षाराणी मुस्कावाड यांना राज्यस्तरीय समाजरत्न काव्य पुरस्कार प्रदान

0
वर्षाराणी मुस्कावाड यांना राज्यस्तरीय समाजरत्न काव्य पुरस्कार प्रदान

उदगीर (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, धुळे जिल्हा समुहा तर्फे साहित्यिका वर्षाराणी मुस्कावाड यांना राज्यस्तरीय समाजरत्न काव्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यस्तरीय काव्य लेखन उपक्रम ” प्रेम कळी हुंडाबळी ” या विषयावर आधारित अतिशय हृदयस्पर्शी लेखन करुन समाजाला एक नवी दिशा देण्याचे कार्य आपल्या हातून घडत आहे! आपली लेखणी अशीच विधायकपणे सत्य मांडत रहावी म्हणून आपणास ” समाज रत्न काव्य पुरस्कार ” सन्मानपत्राने गौरविण्यात येत आहे त्याबद्दल आपले हृदयापासून अभिनंदन असे गौरवोद्गार पुरस्कार जाहीर करणाऱ्या पत्रात काढले आहेतप्रसिद्ध साहित्यिका वर्षाराणी मुस्कावाड या शांतिनिकेतन विद्यालय कोदळी ता उदगीर येथे सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्या विद्यार्थी प्रिय सहशिक्षिका, उत्कृष्ट सूत्रसंचालिका, गायिका म्हणून परिचयाच्या आहेत.राज्यस्तरीय समाज रत्न काव्य पुरस्कार प्रदान झाल्याबद्दल वर्षाराणी मुस्कावाड यांचे अभिनंदन राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सहशिक्षक विश्वनाथ मुडपे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर, एनसीसी प्रमुख बालाजी मुस्कावाड, प्रा. कुमार बंडे, प्रा धनराज बंडे, मुख्याध्यापक राजेंद्र भोसले, माजी शिक्षण विस्तार अधिकारी शिवशंकर पाटील, अंबिका पारसेवार यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!