पशुवैद्यकीय महाविद्यालय येथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सहा दिवसीय प्रशिक्षणाची सांगता
उदगीर (एल पी उगिले) : पशुवैद्यकीय महाविद्यालय, महाराष्ट्र पशुविज्ञान व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर व पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने उदगीर पशुवैद्यकीय महाविद्यालय येथे पशुसंवर्धन खात्यातील पशुधन विकास अधिकारी यांच्यासाठी सहा दिवसीय तांत्रिक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद डॉ. नंदकुमार गायकवाड, सहयोग अधिष्ठाता, पशुवैद्यकीय महाविद्यालय उदगीर यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.अनिल भिकाने, संचालक, विस्तार शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र पशुविज्ञान व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमांमध्ये डॉ. अनिल भिकाणे यांनी पशुवैद्यकांशी संवाद साधला व त्यांना मार्गदर्शन केले.त्यांनी आपल्या मार्गदर्शनात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपले ज्ञान अद्ययावत ठेवून सतत शिकण्याच्या प्रक्रियेतून प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून पशुवैद्यकांचा व सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी कार्य करावे.तसेच दुग्ध, अंड्याचे सेवन आणि अलर्क (रेबीज) प्रतिबंध याबाबत शेतकरी व समाजामध्ये जनजागृती करणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. डॉ. एन. झेड. गायकवाड, यांनी नव्या वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर करून रोगांचे निदान व उपचार करण्यात सतत पुढे राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले.शेतकरी आणि पशुधनाची चांगली सेवा करण्यासाठी तसेच रोग नियंत्रणाद्वारे पशुधनाच्या उत्पादन क्षमतेत वाढ करण्यासाठी क्षेत्रीय पशुवैद्यांनी स्वतःला जागतिक तंत्रज्ञानाशी अद्ययावत ठेवले पाहिजे असे नमूद केले.सदरील तांत्रिक प्रशिक्षणासाठी औरंगाबाद विभाग तसेच लातूर विभागातील एकूण 25 पशुधन विकास अधिकारी उपस्थित होते. या तांत्रिक प्रशिक्षणा अंतर्गत रोग निदानासाठी लागणारे व उपचारासाठी आवश्यक असे अद्यावत तंत्रज्ञान जसे क्षय किरण, सोनोग्राफी, शेळ्या मधील मारतुकीचे प्रमाण कमी करणे, रेबीज वरील अध्यावत उपचार पद्धती, असे एकूण २० मार्गदर्शनपर प्रात्यक्षिके तसेच संवाद आयोजित करण्यात आले होते. पशूवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ञ प्राध्यापक डॉ. गोपाल भारकड, डॉ.अ.वि. भोसले, डॉ. प्राणेश येवतीकर, डॉ.ए.डी. पाटील, डॉ. प्रशांत मसारे, डॉ. सुरेश घोके, डॉ.मत्स्यगंधा पाटील, डॉ. रवी सूर्यवंशी, डॉ. संभाजी चव्हाण, डॉ.प्रफुलकुमार पाटील, डॉ. राम कुलकर्णी, डॉ. प्राजक्ता जाधव, डॉ. रवींद्र जाधव यांनी मार्गदर्शन केले.तांत्रिक प्रशिक्षणाचे समन्वयक डॉ. अशोक वि. भोसले यांनी सदरील प्रशिक्षणाचा ६ दिवसाचा आढावा सादर केला, व सर्वांचे शब्दसुमनाने स्वागत केले. या कार्यक्रमाचे संचालन डॉ. मत्स्यगंधा पाटील व डॉ. प्रशांत मसारे सह-समन्वयक, यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. गोपाळ भर्कड, डॉ. पी. व्ही. पाटील यांचे विशेष योगदान लाभले. कार्यक्रमात सर्व सहभागींना प्रमाणपत्रे व संक्षेपिके प्रदान करण्यात आली. या संक्षेपिकेच्या मुद्रणासाठी डॉ. संतोष शिंदे यांनी प्रायोजकत्व दिले. हे प्रशिक्षण व निरोप समारंभाचा कार्यक्रम पार पडण्या करिता डॉ. महेश कुलकर्णी, डॉ. आकांक्षा भालेराव, डॉ. साई ऋषब बच्चू , डॉ. सौरव वाघ, डॉ. ब्रिजेश आडे, डॉ. स्वरदा पारवेकर यांनी अथक परिश्रम घेतले.
