महात्मा बसवण्णा यांनी दिलेल्या मानव धर्माचा संदेशानुसार बसव प्रतिष्ठाणच कार्य – शरण पाटील

0
महात्मा बसवण्णा यांनी दिलेल्या मानव धर्माचा संदेशानुसार बसव प्रतिष्ठाणच कार्य - शरण पाटील

मुरूम (प्रतिनीधी) : क्रांतिसूर्य विश्वगुरू महात्मा बसवेश्वर यांनी १२ व्या शतकात मानवता धर्माचा संदेश देत अनुभव मंटपच्या माध्यमातून सर्व धार्मियांना एकत्रित आणून जातभेद नष्ट करून समाज उन्नतीसाठी त्यांनी योगदान दिले आणि त्याच तत्वावर बसव प्रतिष्ठाण कार्य करत असल्याचे मत शरण पाटील यांनी व्यक्त केले. धाराशिव जिल्ह्यातील मुरूम येथे बसव प्रतिष्ठाण अखिल भारतीय सामाजिक संघटनेच्या वतीने श्री महात्मा बसवेश्वर जयंती उत्सवानिमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार देऊन २७ व्यक्तीना सन्मानित करण्यात आला व त्याचबरोबर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील १ ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांना प्राथमिक स्वरूपात शालेय साहित्याचा वाटप कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी ते बोलत होते. बसवरत्न पुरस्कार सोहळ्याचे हे ११ वर्ष होते. याप्रसंगी शाहीर रमेश खाडे यांचा श्री महात्मा बसवण्णा पोवाडा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण बसवराज पाटील होते. तर प्रमुख अतिथी म्हणून संचालक साखर आयुक्तालय पुणे डी. आय. गायकवाड,विठ्ठलसाई कारखाना संचालक विठ्ठलराव बदोले, उद्योजक बालाजी सुरवसे, नगर परिषद मुरूम मुख्याधिकारी सचिन भुजबळ, माजी नगराध्यक्ष रशीद शेख, बसप्पा वळसंग,शाहीर रमेश खाडे, बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे आदींची उपस्थिती होती. प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णाकृती पुतळयाला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन, राष्ट्रगीत, शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पुढे बोलताना पाटील म्हणाले, थोर समाजसुधारक महात्मा बसवण्णा यांचे विचार सर्वधर्म समभावाचे होते. लोकशाही आद्यजनक म्हणून ही त्यानं संबोधले जाते, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी करून पुरस्कार प्राप्त व्यक्तींना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विठ्ठलराव बदोले यांनी बोलताना बसव प्रतिष्ठाण चे कार्य कौतुकास्पद असून त्यांच्या सामाजिक कार्याला मर्यादा नाहीत म्हणूनच आज या व्यासपीठाच्या माध्यमातून विविध धर्मीय,विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान ते गेले ११ वर्षापासून करत असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.यावेळी डी. आय. गायकवाड, सुरवसे, भुजबळ आदिनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण ठाकूर यांनी तर, प्रास्ताविक डॉ. रामलिंग पुराणे आणि आभार प्रा. डॉ. सौ. मनीषा नागिले यांनी मानले. यावेळी असंख्य महिला भगिनीं, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डिंगबर सोनटक्के, महेश लोणी, मल्लिनाथ सगरे,विजय घोडके, अमित ढाले, सागर कोळी, उमेश पुराणे, शुभम पुराणे, आकाश वगरे आदिसह समाज बांधवानी परिश्रम घेतला.या कार्यक्रमांमध्ये विशेष सत्कार बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त “महाराष्ट्ररत्न” पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना मुरूम येथील धनगर समाज बांधवाच्या वतीने शरण पाटील यांच्या हस्ते काठी आणि घोंगडे भेट देऊन सत्कार करण्यात आला.बसवरत्न पुरस्कार मिळालेल्या मान्यवरांची यादी कशी आहे,श्रीराम सुभाष कुलकर्णी, मुरूम, सामाजिक,संतोष विलासराव तगरखेडे, निलंगा, आरोग्य सेवा,अशोक सुऱ्याबा आलदर, सांगोला, सामाजिक बालाजी विश्वनाथ सुरवसे, धाराशिव, पत्रकार,शेषेराव अंकुश लवटे, कोरेगाव वाडी, सामाजिक,संतोष मधुकर महिमकर सांगोला, सामाजिक क्षेत्र,अविनाश गुंडेराव काळे,उमरगा, पत्रकार,कांतराव हणमंतराव मंडले, बेरडवाडी, सामाजिक,बाळकृष्ण भारत साळुंके, धाराशिव, प्रशासकीय,पंडित बाबुराव मूदकण्णा,मुरूम, व्यापार,ॲड.फरहीन खान पटेल,उमरगा,विधिज्ञ,सचिन महादेव भुजबळ, वडगाव प्रशासकीय,प्रदीप गुरुनाथ गव्हाणे,मुरूम, सर्प मित्र,विजय गणेश सावतर, जागजी ता.जि. धाराशिव,संगीत,ॲड.एस पी इनामदार, केसरजवळगा,विधिज्ञ क्षेत्र,पंकज बबन बनसोडे,मुरूम, व्यापार,बाबासाहेब मल्लिनाथ पाटील,कोथळी, कृषी,बालाजी अजिनाथ सुरवसे, भूम, उद्योजक,आप्पासाहेब धानप्पा मुंडासे, मुरूम, सामाजिक,अभिजित महादेव लोके, अक्कलकोट, सामाजिक क्षेत्र,श्रीमती सविता संभाजीराव मुरूमकर,मुरूम , शैक्षणिक,रमेश खाडे सोलापूर, शाहीर,अजित पंडितराव पाटील जकेकूर, कृषी तसेचजीवनगौरव पुरस्कार देऊन काशिनाथ संभाजी मिरगाळे,मुरूम, शैक्षणिक,चंद्रकांत रत्नू राठोड,बेळंब तांडा,महसूल सेवा,डॉ. महेश महालिंग अर्दाले,लातूर, वैद्यकीय, शिवशरण गुरलिंगप्पा वरनाळे, मुरूम, सहकार यांचाही सत्कार करण्यात आला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!