लातूर, पुणे,बीड व धाराशिव जिल्ह्यातून चोरी केलेल्या 7 बुलेट मोटारसायकलीसह दोन आरोपीना अटक

0
लातूर, पुणे,बीड व धाराशिव जिल्ह्यातून चोरी केलेल्या 7 बुलेट मोटारसायकलीसह दोन आरोपीना अटक

लातूर (एल पी उगिले) : लातूर पुणे बीड आणि धाराशिव या जिल्ह्यातून मोटारसयकल चोरांनी चोरी केलेल्या सात बुलेट स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पकडल्या आहेत. दोन आरोपींनाही अटक करण्यात आली आहे.या बाबत थोडक्यात हकीकत अशी की,पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते. पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या विशेषतः मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता विशेष पथके स्थापन करून गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न सुरू होते . त्या अनुषंगाने सदर पथके माहितीचे संकलन करीत असताना, माहिती घेत असताना दिनांक 25/05/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, काहीजण गरुडचौक,रिंग रोड जवळील मोकळ्या जागेत थांबून संशयितरित्या मोटरसायकली चा खरेदी-विक्री व्यवहार करीत आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने दिनांक 25/05/2025 रोजी सदर पथक तात्काळ गरुड चौक परिसरात पोहचून बुलेट मोटार सायकलीसह थांबलेल्या इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडील मोटारसायकल संदर्भाने विचारपूस केली असता त्यांनी त्यांनी त्यांचे नाव सुरज बाळासाहेब गायकवाड, (वय 21 वर्ष, राहणार मोगरा तालुका माजलगाव जिल्हा बीड),गणेश उर्फ संकेत सुरेश गंगात्रय, (वय 24, राहणार आडस तालुका केज जिल्हा बीड).असे असल्याचे सांगून त्यांनी इतर साथीदार नामे अंकुश बाबासाहेब नागरगोजे (वय 23 वर्ष, राहणार घागरवाडा तालुका धारूर जिल्हा बीड (फरार)),एक विधी संघर्ष बालक राहणार केज जिल्हा बीड.अशांनी मिळून लातूर, बीड, धाराशिव व पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून इनफिल्ड कंपनीचे 6 बुलेट व एक इतर मोटारसायकल चोरी केल्याचे सांगितले. त्यावरून नमूद आरोपीकडून त्याने चोरलेल्या मोटरसायकलच्या चेसीस व इंजिन क्रमांक वरून पडताळणी केली असता, पोलीस ठाणे एमआयडीसी हद्दीतील बुलेट मोटरसायकल चोरीचे दोन गुन्हे तर उर्वरित पोलीस ठाणे शिवाजीनगर बीड, ढोकी व भारती विद्यापीठ पोलीस ठाणे पुणे येथील पोलीस ठाण्याला चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यावरून 5 लाख 90 हजार रुपये किमतीच्या सात मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. नमूद पुढील तपास कामी आरोपींना पोलीस ठाणे एमआयडीसी येथे पुढील कार्यवाहीस्तव ताब्यात देण्यात आले आहे. संबंधित पोलीस ठाणेचे पोलीस पुढील तपास करीत आहेत.सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे यांच्या नेतृत्वातील पथका मधील पोलीस अंमलदार युवराज गिरी, संजय कांबळे, विनोद चलवाड,राजेश कंचे,राहुल सोनकांबळे, मोहन सुरवसे, जमीर शेख, सिद्धेश्वर मदने, राहुल कांबळे तसेच सायबर सेल येथील संतोष देवडे, गणेश साठे, शैलेश सुडे यांनी पार पाडली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!