कोनाळी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबनेच्या निषेरधार्थ भव्य मोर्चा व रास्ता रोको आंदोलन पार पडला

0
कोनाळी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबनेच्या निषेरधार्थ भव्य मोर्चा व रास्ता रोको आंदोलन पार पडला

देवणी (प्रतिनिधी)देवणी तालुक्यातील कोनाळी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काही समाजकंठकांनी 23 मे रोजी विटंबना केल्यामुळे याच्या निषेधार्थ 26 मे रोजी भव्य मोर्चा व रास्ता रोको आंदोलन देवणी शहरातील बोरोळ चौकात करण्यात आले.या आंदोलनात त्या समाजकंटकाना मोठी शिक्षा द्यावी, अशी घोषणा देण्यात आली.तसेच उपस्थित तहसीलदार, पोलीस अधिकारी आदीना निवेदन देण्यात आले. या गुन्ह्यातील सर्व आरोपींना लातूर,पुणे,छत्रपती संभाजीनगर या तीन जिल्ह्यातून तडीपार करण्यात यावे, कारण यांच्यावर मागील गुन्ह्याची पार्शवभूमी पाहून त्यांना तडीपार करण्यात यावे.तेंव्हाच कोणाळी गावात शांतता व सुव्यवस्था नांदेल.असा उल्लेख करण्यात आला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!