अहमदपूर गुन्हे प्रकटीकरण शाखेचा दमदार कामगिरी ; 13 लाख 75 हजाराचा गुटखा व मुद्देमाल जप्त

0
अहमदपूर गुन्हे प्रकटीकरण शाखेचा दमदार कामगिरी ; 13 लाख 75 हजाराचा गुटखा व मुद्देमाल जप्त

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील अवैद्य धंद्याना आळा घालण्यासाठी लातुर जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदपूर पोलीस स्टेशन प्रभारी पोलीस निरीक्षक यांनी विविध पथकांची निर्मिती केली असुन तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्यावर कार्यवाही करून 13 लाख 75 हजारांचा गुटखा व मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन अहमदपूर पोलीसात दि 18 मे रोजी रात्री तीघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. याविषयी सविस्तर माहीती, अशी की लातुर जिल्ह्यातील अवैद्य धंद्याचे समुळ उच्चाटन करण्यासाठी लातुर जिल्हा पोलीस अधिक्षक सोमय मुंडे अप्पर पोलीस अधिक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक बि. डी भुसनुर अहमदपूर यांनी वेगवेगळ्या पथकाची निर्मिती केली असुन गुन्हे प्रकटीकरणाच्या शाखेतील ( पथकातील ) पोलीस उप- निरिक्षक स्मिता जाधव,पोहेकॉ तानाजी आरदवाड, पोहकॉ बबन चपडे, पोकॉ शिवशंकर चोले , पोकॉ प्रकाश भोपळे, पोकॉ हरिप्रसाद कांबळवाड, पोकॉ विशाल मुंडे ,विशाल सारोळे ,आदी गस्तीवर असताना गोपीनीय माहीतीच्या आधारे दि 18 मे रोजी दुपारी 12 : 30 वाजता महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील उदगीर रोडवर असलेल्या उड्डान पुलाखाली उदगीर हुन शिरूर ताजबंद कडे चोरच्या पद्धतीने विक्रि व वाहतुक करत असताना पान मसाला , हिरा पान मसाला, महा रॉयल , विमल तंबाखु एम.एच 44 यु 1742 क्रमांकाची जुनी टाटा कंपनीची बोलेरो पिकप सहीत 13 लाख 75 हजारांचा मुद्देमाल पकडण्यात आला असुन सदर प्रकरणामध्ये पोलीस हवालदार तानाजी आरद्वाड यांचे फिर्यादवरून आरोपी रंजीत कोरडे, मुददेमालाचा व वाहनाचा मालक अशोक सकराते व फरार आरोपी चालक गणेश सावंत तीघे रा. माजलगाव जि. बीड यांचेवर दि 18 मे रोजी पोलीस स्टेशन अहमदपूर येथे गुरनं 342/2025 भारतीय न्याय संहीता कलम 223, 123,274,275 सह कलम 59 अन्न सुरक्षा अधिनीयम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील एक आरोपी रंजीत कोरडे रा. माजलगाव यास अटक करण्यात आली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!