शैक्षणिक कागदपत्रासाठी तहसील कार्यालयात कॅम्पचे आयोजन – तहसीलदार उज्वला पांगरकर
अहमदपूर (गोविंद काळे) : दहावी व बारावी बोर्डाचे निकाल लागले असून अनेक विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी विविध प्रकारचे कागदपत्रे ची आवश्यकता असते त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज राज्य समाधान अभियानांतर्गत अहमदपूर तहसील कार्यालयाच्या वतीने विविध गावांमध्ये शैक्षणिक कागदपत्रासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे विशेषतः दहावी वर्गाच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी अकरावी प्रवेश ऑनलाईन पद्धतीने झाल्यामुळे त्यासाठी त्यांना रहिवासी प्रमाणपत्र,उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र इत्यादीची नोंदणी करने गरजेचे आहे त्यासाठी ही कागदपत्रे त्वरित उपलब्ध व्हावे यासाठी वरील अभियानांतर्गत विविध गावांमध्ये शिबिर आयोजित करण्यात आले असून दि २० मे रोजी खंडाळी येथे तर दि २१ मे रोजी बुधवारी तहसील कार्यालय अहमदपूर येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी गरजू विद्यार्थ्यांनी व पालकांनी वरील ठिकाणी संपर्क करावा तसेच शाळा व महाविद्यालयाने आपल्या स्तरावर विद्यार्थ्यांना शिबिरासंबंधी सूचना द्याव्यात असे आव्हान तहसीलदार उज्वला पांगरकर यांनी सांगितले आहे.तसेच सदर ठिकाणी CSC सेंटर मार्फत शेतकरी ओळख क्रमांक/ फॉर्मर आयडी शेतकऱ्यांनी काढून घ्यावेत असे आवाहनही करण्यात येत आहे.
