किनगावात पिकअप सह 19 लाखाचा गुटखा जप्त किनगाव पोलीसाची कार्यवाही
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील किनगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालया समोर दहिफळे फर्निचरच्या पाठीमागे भाड्याच्या गोडाऊन मधून ठोक गुटखा विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच किनगाव पोलिसांनी शुक्रवारी दि. 23 रोजी सकाळी धाड मारली. या धाडी मध्ये पिकअप, स्कुटी व मानवी शरीरास हानिकारक विषारी गुटखा अंदाजे किंमत 18 लाख 72 हजार 860 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तिघावर सांयकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत पोलीस सुत्राकडून मिळालेली माहिती अशी की किनगाव येथे संतोष फड हा भाड्याने गोडाऊन घेऊन त्यामधून गुटखा ठोक विक्री करत असतात करत असल्याची माहिती किनगाव पोलिसांना लागली किनगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोन सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे व त्यांच्या पथकांनी गोडाऊनवर शुक्रवारी दि. 23 रोजी सकाळी 8.30 वाजता धाड ठाकली.या धाडी मध्ये गुटखा घेऊन आलेली एक महिंद्रा बोलोरो पिकअप क्रमांक एम. एच. 44 यु 3864 जुनी पिकअप गाडी, इलेक्ट्रिकल स्कुटर अंदाजे किंमत 7 लाख व सुगंधी तंबाखू, विमल पानमसाला, आर. एम डी. पानमसाला, एम सुगंधी तंबाखू गोल्ड, बाबा नौरतन पानमसाला, रजनीगंधा सुगंधीत पानमसाला इतर प्रकारचा मानवी शरीरास हानिकारक असलेला विषारी गुटखा अंदाजे किंमत 11 लाख 72 हजार 860 असे एकूण 18 लाख 72 हजार 860 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.गुटखा विक्री करणारा संतोष फड, पिकअप चालक गोविंद उदरे व क्लीनर शहबाज शेख या तिघावर सोपोनि भाऊसाहेब खंदारे यांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी दि. 23 रोजी सांयकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वच आरोपी फरार असून पोलीस त्यांचा तपास करीत आहेत. सदर कारवाई मध्ये सपोनि भाऊसाहेब खंदारे, पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ सिरसाट, चालक पोलीस हवालदार महादेवा दहिफळे, पोलीस नाईक अनिल इस्ताळकर, पोलीस अमलदार सूरज कोतवाड, शिवाजी गोरे आदींचा समावेश होता. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ सिरसाट करीत आहेत.
