गोताळा येथील शेतात विज पडून दोघांचा जागीच मृत्यु तर एक जण गंभीर जखमी

0
गोताळा येथील शेतात विज पडून दोघांचा जागीच मृत्यु तर एक जण गंभीर जखमी

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील गोताळा येथील एका शेतकऱ्याच्या शेतात काहीजण काम करत असताना सायंकाळी विजेच्या कडकडाटासह आलेल्या पावसात गावातीलच आठ जणांवर अचानक विज पडून दोघांचा जागीच मृत्यु झाला आहे तर एक जण गंभीर झाल्याची घटना दि 26 मे रोजी सायंकाळी 05 : 3O ते O6 :0O वाजण्याच्या दरम्याण घडली आहेयाविषयी सविस्तर माहीती अशी कि , अहमदपूर तालुक्यातील गोताळा येथील शेतकरी विक्रम सोपान कारले यांच्या शेतामध्ये भुईमुंगाच्या शेंगा काढण्यासाठी महेश विक्रम कारले वय 3O वर्ष, अर्पिता भास्कर कांबळे वय 2O वर्ष, कविता महेश कारले वय 26 वर्ष, महानंदाबाई सुखाचार्य सुर्यवंशी वय 52 वर्ष, बालीका धनराज कांबळे वय 35 वर्ष, आरती केशव जाधव वय 21 वर्ष , विक्रम सोपान कारले वय 55 वर्ष सर्व जण रा गोताळा ता अहमदपूर हे गेले होते शेतातील भुईमुंगाच्या शेंगा काढत असताना दि 26 मे रोजी सायंकाळी 05 : 3O ते O6 :0O वाजण्याच्या दरम्याण विजेच्या कडकडाटासह आलेल्या पावसामुळे वरील सर्व जणांनी पावसात भिजु नये म्हणुन जाग्यावरच बसुन अंगावर चवाळे पांघरून बसले होते परंतु पावसासह अचानक विजेचा कडकडाट होऊन एक विज आठ जणांच्या अंगावर पडली यात विक्रम सोपान कारले वय 55 वर्ष,रंजनाबाई बळी संमुखराव वय 55 वर्ष या दोघांचा जागीच मृत्यु झाला असुन अर्पिता भास्कर कांबळे वय 2O वर्ष ही युवती गंभीर जखमी झाली आहे जखमींना अहमदपूर येथील शासकीय ग्रामीण रूग्णालयात प्रथमोउपचार करून लातुर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेसदरील घटनेची माहीती महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना समजताच त्यांनी शासकीय ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली व प्रशासनास योग्य त्या सुचना करून मयत व जखमींना नातेवाईकांना सरकारच्या वताने सर्वोपतरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!