नेत्रगाव येथे संभाजी ब्रिगेडच्या शाखा स्थापनेचे उद्घाटन.

0
नेत्रगाव येथे संभाजी ब्रिगेडच्या शाखा स्थापनेचे उद्घाटन.

उदगीर (प्रतिनिधी) : तालुक्यातीलनेत्रगाव येथे संभाजी ब्रिगेडच्या शाखेचे उद्घाघाटन थाटामाटात पार पडले. अध्यक्षाचे व प्रमुख पाहुण्याचे फटाके वाजवून जंगी स्वागत करण्यात आले. प्रथम जिजाऊ वंदना घेण्यात आली. तेहतीस व्या ग्रामगीतेचे वाचक गरड महाराज यांच्या हस्ते पूजन करून अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फलकाचे उद्घाटन करण्यात आले.गरड महाराजांनी मानव समाज हा व्यसनाच्या आहारी जात आहे.याला आळा बसला पाहिजे, असे मत व्यक्त केले. तर संभाजी ब्रिगेडचे विधानसभा अध्यक्ष उत्तमरावजी फड यांनी संभाजी ब्रिगेडचे कार्य कसे असले पाहिजेत, याची माहिती दिली. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष आपल्या कार्यकर्त्यांनी केव्हाही समाजसेवेसाठी तत्पर असले पाहिजे असे मत व्यक्त केले. यावेळी गरड महाराज ,ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री राजकुमार माने, विधानसभा अध्यक्ष शिवश्री उत्तमराव फड ,जिल्हा संघटक मेहबुब सय्यद, तालुका अध्यक्ष राजकुमार भालेराव, जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब चिंचोलकर, जिल्हा उपसचिव व्यंकट थोरे, जिल्हा उपाध्यक्ष विकास भंडे ,तालुका संघटक सुरज आटोळकर, शाखाध्यक्ष पांडुरंग बिरादार, शाखा उपाध्यक्ष प्रशांत बिरादार, सचिव विजय बिरादार, अक्षय बिरादार, ओमकार बिरादार, प्रसाद बिरादार, पांडुरंग बिरादार, पृथ्वीराज राचोटे, रोहित बिरादार, रामेश्वर बिरादार , अजय बिरादार, शिवम बिरादार, तानाजी बिरादार, लक्ष्मण जिरगे , बालाजी बिरादार विकास बिरादार , शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा सेना तालुकाप्रमुख व गावकरी मंडळी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!