दोन तालुक्याच्या सीमे रेषेवरील अतिक्रमित शिवरस्ता खुले करण्यास सुरुवात

0
दोन तालुक्याच्या सीमे रेषेवरील अतिक्रमित शिवरस्ता खुले करण्यास सुरुवात

उदगीर (एल पी उगिले) : उदगीर तालुका लगत असलेल्या शिरूर अनंतपाळ तालुका या दोन्ही तालुक्याच्या सीमेरेषेवर शिव रस्ता अतिक्रमित झाला होता, लातूरच्या जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे यांच्या आदेशाने व उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर तसेच शिरूर अनंतपाळ येथील तहसीलदार पेद्देवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हेर विभागाचे मंडळ अधिकारी पंडित जाधव, साकोळचे मंडळ अधिकारी नवनाथ खंदाडे यांनी उदगीर व शिरूर अनंतपाळ तालुक्याच्या सीमे रस्तेवरील सताळा, दैठणा शिव रस्ता खुला करण्यासाठी त्यांचे सताळा येथील ग्राम महसूल अधिकारी अनुराधा अलगुले, दैठणा येथील ग्राम महसूल अधिकारी जाधव यांनी या परिसरातील शेतकऱ्यांना या रस्त्याबाबत माहिती देऊन लोकसभागातून रस्ता खुला करण्यासाठी सांगितले. त्यानुसार या परिसरातील शेतकरी शिवाजी हनमंतराव हुडे, रमेश पाटील, सदानंद पाटील, दैठणा उप सरपंच योगेश बिरादार, कुलदीप पाटील, नितीन पाटील, भाऊराव पाटील, दत्ता सांगवे, दिलीप बिरादार यांनी लोकसभागातून निधी जमा केला. त्यानंतर उपाधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय उदगीर येथील मोजणीदार हनीफ बागवान, उपाधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय शिरूर आनंदपाळ येथील मोजणीदार शेख यांनी चुना टाकून खुणा केल्या. त्यानंतर हा रस्ता खुला करण्यास सुरुवात करण्यात आली. असे रस्ते व शेत रस्ते वहिवाट रस्ते खुले करून घ्यावे, असे आवाहन उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकर यांनी केले आहे. तरी शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!