लातूर जवळ भीषण अपघातात स्व. गोपीनाथराव मुंडे समर्थक माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा मृत्यू

0
लातूर जवळ भीषण अपघातात स्व. गोपीनाथराव मुंडे समर्थक माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा मृत्यू

लातूर (एल पी उगिले) : औसा रोडवर बेलकुंड गावाजवळ कार उलटून झालेल्या भीषण अपघातात स्व. गोपीनाथराव मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा जागीच मृत्यू झाला. तर चालक गंभीर जखमी आहे. हा अपघात सोमवारी दुपारी ४. १९ वाजेच्या दरम्यान झाल्याची माहिती आहे. देशमुख हे माजलगाव मतदारसंघात २०१४ ते २०१९ साली आमदार होते.माजलगावचे माजी आ. आर. टी. देशमुख हे आपल्या कारने ( क्र. एमएच ४४ एडी २७९७) तुळजापूर मार्गे लातूरकडे येत होते. दुपारी ४:१९ वाजता बेलकुंड नजीक असलेल्या उड्डाणपुलावरून काही अंतरावर कार पुढे आल्यावर रस्त्यावर साचलेले पाणी कारच्या काचेवर पडले.

लातूर जवळ भीषण अपघातात स्व. गोपीनाथराव मुंडे समर्थक माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा मृत्यू

त्यामुळे चालकाचा कारवरील ताबा सुटला. बाजूस असलेल्या रस्त्याच्या कठड्याला कार जोरात धडकली. अपघातात कार चारवेळा पलटी झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. यात कारचालक व सोबत असलेले माजी आ. आर. टी. देशमुख गंभीर जखमी झाले होते. दोघांनाही रुग्णवाहिकेतून लातूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, रस्त्यातच माजी आ. आर. टी. देशमुख यांचा मृत्यू झाला. चालकावर उपचार सुरू आहेत. अपघात एवढा भीषण होता की, गाडीचा चेंदामेंदा झाला आहे.माजी आमदार आर टी देशमुख हे बीड जिल्ह्यामध्ये आणि परिसरात जिजा म्हणून होते. २०१४ मध्ये माजलगावामध्ये राष्ट्रवादी चे प्रकाश सोळंके यांचा देशमुख यांनी जवळपास ३७ हजार मताधिक्क्याने पराभव केला होता. त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोठे योगदान दिले होते. त्यांच्या निधनाने एक अनुभवी व प्रगल्भ नेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.गाडीने उड्डाणपुलाच्या दुभाजकाचे कठडे तोडले,चालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर चारचाकी रस्त्याच्या बाजूला उलटली. गाडीने दोन ते तीन पलट्या घेतल्याची माहिती सांगितली जात आहे. गाडीतील चालक आणि माजी आ. देशमुख दोघेही गंभीर जखमी झाले होते. जवळच असलेल्या पोलिस चौकीतील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तत्काळ १०८ रुग्णवाहिकेस पाचारण केले. पोलिस आणि इतर वाहनधारकांनी गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या दोघांना गाडीतून बाहेर काढले. गंभीर जखमी झालेल्या देशमुख यांना तत्काळ उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!