गुणवंताचा व यशस्वीतांचा गुणगौरव…!! नांदगाव ग्रामपंचायतिचा अनोखा उपक्रम……!!!
गुणवंताचा व यशस्वीतांचा गुणगौरव…!! नांदगाव ग्रामपंचायतिचा अनोखा उपक्रम……!!!
लातूर (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत कार्यालय नांदगाव च्या वतीने एक अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत यशस्वी झालेल्या गुणवंतांचा व विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या यशस्वीतांचा सन्मानचिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना व पालकांना करिअर विषयी मार्गदर्शन व आपल्या समोरील आव्हाने या सखोल मार्गदर्शन केले गेले.
याप्रसंगी इयत्ता दहावी व बारावी मधील प्रथम द्वितीय तृतीय व विशेष प्राविण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार तसेच मागील वर्षामध्ये गावातील विविध क्षेत्रांमध्ये संपादन केलेले मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या सत्कार प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी प्रथम नागरिक व लोकनियुक्त,लोकप्रिय सरपंच सौ. माया आनंद पाटील होत्या,प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून श्री मधुकर ढमाले (शिक्षण विस्तार अधिकारी लातूर) श्री सायसराव मुंढे (प्राचार्य मुकुंदराजविद्यालय नांदगाव) श्री गणेश चित्ते (पोलीस उपनिरीक्षक) श्री ज्ञानेश्वर एडवळे (पोलीस उपनिरीक्षक) श्री बालाजी नामदास सर श्री भीम यादव सर यांनी विद्यार्थ्यांना पालकांना विद्यार्थ्यांच्या भविष्यातील करिअर विषयी योग्य ते मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.श्री धीरज बळीराम पाटील सूत्रसंचालन श्री ज्ञानेश्वर बापूराव साळुंखे तसेच आभार प्रदर्शन श्री अमोल शिवाजी कोटीवाले यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रोहित भैया पाटील मित्र मंडळ व ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.
