राष्ट्रसंत गाडगे बाबा महाराज यांच्या पुर्णाकुती पुतळा उभारणीच्या कामांचे भुमीपुजन
राष्ट्रसंत गाडगे बाबा महाराज यांच्या पुर्णाकुती पुतळा उभारणीच्या कामांचे भुमीपुजन
उदगीर (प्रतिनिधी) : स्वच्छतेचे पुजारी राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या पूर्णकृती पुतळ्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत होती. या मागणीचा सहानुभूती पूर्ण विचार करून आ. संजय बनसोडे यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा करून या पुतळ्याला मंजुरी घेतली होती. त्यांच्या प्रयत्नामुळे मंजुर झालेल्या उदगीर येथील राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज पूर्ण कृती पुतळ्याच्या कामाला सुरुवात करण्यासाठी भूमिपूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. राष्ट्रसंत गाडगे बाबा महाराज चौक उदगीर या ठिकाणी लातुर जिल्हातील पहिला संत गाडगे बाबा महाराज पुर्णाकृती पुतळा उभारणी कामांचे भुमीपुजन नगर परिषद उदगीरचे माजी उपाध्यक्ष सुधीरभाऊ भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक तथा प्रख्यात स्त्री रोग तज्ञ डॉ शरदकुमार तेलगाने, माजी नगरसेवक दत्ता पाटील, पप्पू गायकवाड़, भगवानराव तेलंगे, सर्वेशजी बिरादार, अमोल गाजरे, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद तेलंगे,शाम सांळुके,कलीम शेख , उमाकांत शेळके यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी मंत्री तथा विद्यमान आ. संजय बनसोडे यांनी दिलेला शब्द पाळल्याबद्दल त्यांचे ऋणही व्यक्त करण्यात आले.
