भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तरच्या वतीने श्रामणेर प्रशिक्षण शिबीरास उस्फुर्त प्रतिसाद ; ४४ प्रशिक्षणार्थी सहभागी
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तरच्या वतीने श्रामणेर प्रशिक्षण शिबीरास उस्फुर्त प्रतिसाद ; ४४ प्रशिक्षणार्थी सहभागी
नांदेड (उध्दव सरोदे) : भारतीय बौद्ध महासभा संस्थापक डॉ.बाबासाहेब आंबेडकर,संरक्षक महाउपासिका मिराताई य.आंबेडकर,ट्रस्टी चेअरमन डाॅ.हरिष रावलीया,रिपोर्टिंग ट्रस्टी चेअरमन ॲड.सुभाष जौंजाळे,राष्ट्रीय कार्याध्यक्ष भिमराव य.आंबेडकर यांच्या आदेशान्वये भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तर यांच्या वतीने भीमघाट येथील नालंदा बुद्ध विहार येथे नांदेड उत्तर आयोजीत श्रामणेर बौद्धाचार्य शिबीर समारोप कार्यक्रम संपन्न झाला.
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा,शहर शाखा,तालुका शाखा नांदेड उत्तर आयोजीत दहा दिवसीय श्रामणेर प्रशिक्षण शिबीर पुज्य भंते बी.संघपाल महाथेरो (राष्ट्रिय अध्यक्ष भा.बौ.म.भिक्खु संघ )यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली व संबोधी सोनकांबळे (केंद्रिय शिक्षक) विलास गवई(केंद्रिय शिक्षक अकोला) यांचे मार्गदर्शनमध्ये नांलदा बुद्ध विहार,श्रद्धास्थळ भिमघाट नांदेड येथे दहा दिवसीय श्रामणेर शिबीर बुद् विहार,भिमघाट नांदेड येथे भंते शिलरत्न नांदेड व श्रामणेर संघाचे संघप्रमुख भंते महानाम (केंद्रिय शिक्षक अकोला) यांच्या उपस्थितीत संपन्न झाले .प्रारंभी महाकारूणिक तथागत सम्यंक, संम्बुध, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन उपस्थीत मान्यवर यांनी अभिवादन केले. संघनायक यांनी त्रिशरण,पंचशील दिले,सर्व मान्यवर व सेवा करणारे लहान मुले/मुली यांचे स्वागत करण्यात आले.
दहा दिवसीय श्रामणेर शिबीरामध्ये एकुण 44 अधिकारी/कर्मचारी/विद्यार्थी यांनी उत्सपुर्तपण सहभाग घेतला आहे. शिबीरातील श्रामणेर भंते जयसेन(यशवंत ढगे),भंते दयासागर(राहुल बनसोडे),भंते धम्मचारी(मोहन लांडगे),भंते धम्मीक (साहेबराव बडेराव),भंते अशोक किर्ती(गौतम सोंडारे),भंते शिलवंत (साहेबराव डोंगरे)यांनी मनोगत व्यक्त केले.हौसाजी वारघडे (जिल्हाध्यक्ष नांदेड उत्तर),उद्धव सरोदे संघटक तथा पत्रकार ,रेखाताई पंडीत,गणपत गायकवाड जिल्हाध्यक्ष नांदेड उत्तर म्हणाले की, शिक्षणाला शिलाची जोड असावी. असे मनोगत व्यक्त करुन महत्वाच्या सुचना देउन अभिनंदन केले.भंते महानाम,भंते शिलरत्न थेरो सहयोग नगर नांदेड यांनी मार्गदर्शन करुन धम्मदेसना दिली . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश लोकडे (जिल्हा उपाध्यक्ष संस्कार विभाग) होते . प्रास्ताविक व सुरेख असे सुत्रसंचलन दामोधर सरकटे (जिल्हा सरचिटणीस नांदेड उत्तर) यांनी केले . आभार सुभाष नरवाडे(जि.कोषाध्यक्ष उत्तर) यांनी मानले, याप्रसंगी रत्नाकर महाबळे, बी.डी.कांबळे,मेजर सुरेश गजभारे(संरक्षण उपाध्यक्ष-ना.उ.) नागराज कांबळे,सा.ना.भालेराव,हरी कसबे,पैठणे हाटकर,युवराज मोरे (आँडीटर)कृष्णा गजभारे (जि.सं.सचीव),मेजर आनंद झडते (जि.सं.सचीव)जनार्धन जमदाडे,उद्धव सरोदे संघटक तथा पत्रकार,चंद्रकांत चौदंते,रविकीरण जोंधळे (संघटक), कुमारस्वामी माने(संघटक)विजयमाला नरवाडे,ईश्वर जोंधळे(शहराध्यक्ष,गौतम कांबळे,पोर्णिमा सावते,प्रल्हाद जोंधळे, चंद्रकांत घोडगे, बी.के.कदम, सोंडारे, सदाशिव हनुमंत,.आनंदजोंधळे,विजय पोपुलवार,केशव वाघमारे,भगवान वाघमारे,.दादाराव गिरबीडे,ऋषीकेस भदे यांच्या सह सैनिक व जिल्हा शाखा,शहर शाखा,तालुका शाखा नांदेड उत्तर/दशिणचे सर्व पदाधिकारी, केंद्रिय शिक्षक/शिक्षिका,आजी/माजी पदाधिकारी व सहभागी शिबीरार्थी यांचे नातेवाईक उपस्थीत होते. शिबीर यशस्वी करण्यासाठी विविध समीतीमधील तसेच जील्हा, शहर, तालुका शाखा नांदेड उत्तरचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
