अवैध वाहतुकीला आळा घाला तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दक्ष राहून कामे करा खा. डॉ. काळगे

0
अवैध वाहतुकीला आळा घाला तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दक्ष राहून कामे करा खा. डॉ. काळगे

अवैध वाहतुकीला आळा घाला तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दक्ष राहून कामे करा खा. डॉ. काळगे

लातूर (प्रतिनिधी) : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची हेळसांड होऊ नये या दृष्टीने सर्व विभागाची एक व्यापक बैठक लातूरचे आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या आणि प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खा. डॉ. शिवाजीराव काळगे यांनी बोलावली होती. या बैठकीत त्यांनी सर्व विभागाला आवश्यक त्या सूचना केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत आ. अमित देशमुख, जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमाय मुंडे , महापालिका आयुक्त देविदास जाधव व इतर प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत, लातूर जिल्ह्यातील अवैध वाहतुकीला आळा घालून, रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने सविस्तर चर्चा झाली. तसेच लातूर शहर आणि जिल्ह्यातील अवैध वाहतुकीला आळा घालावा.,वाढते अपघात रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, लातूर शहरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावावी.लातूर शहरातील सर्व चौकाच्या ठिकाणी ट्राफिक जाम होत आहे त्यावर उपाययोजना कराव्यात., सर्विस रोडवरील पार्किंग बाबत नियमांची कडक अंमलबजावणी करावी, आवश्यकतेनुसार सर्व सिग्नल व्यवस्था कार्यान्वित ठेवाव्यात.,लातूर शहर तसेच जिल्ह्यातील अपघात प्रवण स्थळांचा शोध घेऊन त्या ठिकाणी उपाययोजना कराव्यात. राज्य तसेच राष्ट्रीय महामार्ग आणि इतर महत्त्वाच्या मार्गावरील रेंगाळलेली कामे त्वरित पूर्ण करावीत., मंगल कार्यालये, मॉल, शाळा, महाविद्यालय, क्लासेस या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था अनिवार्य करावी, यासह, शहर व जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी बैठकीत सविस्तर चर्चा झाली. वाहतूक व्यवस्थेत सुधारणा घडवून अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिली. त्याचबरोबर नव्याने करण्यात येणाऱ्या उपायोजनाबाबतही माहिती दिली.पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी सतर्क राहून काम करावे असेही खासदार काळगे यांनी सुचित केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!