अहिल्यादेवी होळकरांनी रयतेच्या कल्याणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून कार्य केले – प्रा.डॉ. दत्तात्रय डांगे

0
अहिल्यादेवी होळकरांनी रयतेच्या कल्याणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून कार्य केले - प्रा.डॉ. दत्तात्रय डांगे

अहिल्यादेवी होळकरांनी रयतेच्या कल्याणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून कार्य केले - प्रा.डॉ. दत्तात्रय डांगे

अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त दूरदृश्य प्रणाली द्वारे आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात राज्यातील संशोधक, अभ्यासकांसह बहुसंख्य मान्यवरांनी नोंदवला सहभाग.

अहमदपूर (गोविंद काळे) : माणसासाठी धर्म आहे धर्मासाठी माणूस नाही, हे तत्त्वज्ञान ज्या महाराणीने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखविले अशा जागतिक कीर्तिच्या महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी रयतेच्या कल्याणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून राज्यकारभार केला, असे स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. दत्तात्रय डांगे यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर द्वारा संचलित महात्मा फुले महाविद्यालयाच्या आयक्यूएसी अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्र व महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच मुंबई महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीचे औचित्य साधून दूरदृष्य गुगल मिट या प्रणाली द्वारे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी मराठी साहित्याचे जेष्ठ समीक्षक ललितलेखक तथा कादंबरीकार व शिक्षण तज्ज्ञ प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विचारवंत तथा कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथील मराठी विभागाचे प्रा. डॉ. दत्तात्रय डांगे यांची तसेच उपप्राचार्य डॉ दुर्गादास चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या उपस्थितीत महाविद्यालयाचा शै. वर्ष २०२४ – २५ वार्षिक अंक ‘आसूड’ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विशेषांक प्रकाशित करण्यात आला. तर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. बी. के. मोरे यांच्या सुमधुर ‘वंदे मातरम्’ गायनाने चर्चासत्राची सुरुवात करण्यात आली. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जीवन व कार्याचा गौरव करणारा पोवाडा इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. किरण गुट्टे यांनी दूरदृश्य प्रणाली द्वारे सादर केला.
या प्रसंगी पुढे बोलतांना प्रा. डॉ. दत्तात्रय डांगे म्हणाले की, अहिल्यादेवी होळकर या न्यायप्रिय महाराणी म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत. त्यांनी स्त्रियांना सक्षम करण्याच्या दृष्टीने विविध योजना सुरू केल्या. त्यामध्ये स्त्रियांची सैन्य भरती, प्रशासनातील सहभाग, बालविवाह बंदी,सती प्रथा बंदी , हुंडा बंदी यासारख्या अनिष्ट प्रथा बंद करून स्त्रियांना ही माणूस म्हणून जगण्याचे बळ दिले. त्याचबरोबर कष्टकरी, शेतकरी दीन – दलित आदींच्या कल्याणासाठी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेवून जीवनभर कार्य केले. तसेच मंदिराचा जीर्णोद्धार करून धर्म रक्षणासाठी व राष्ट्रीय एकात्मतेसाठी ही कार्य केले, असे ही ते म्हणाले.
या राष्ट्रीय चर्चासत्राच्या अध्यक्षीय समारोपाप्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, महाराष्ट्राच्या मातीमध्ये ख-या अर्थाने एक अग्निज्योत प्रज्वलित झाली, ती ज्योत एवढी प्रज्वलित झाली की तिची गिनिज बुकाला नोंद करावी लागली, ती ज्योत म्हणजे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर होय. मानकोजी शिंदे व सुशीलाबाई शिंदे यांच्या पोटी या तेजस्वी कन्येचा जन्म झाला. दोघांच्याही संस्कारातून अहिल्यादेवींनी राज्यशास्त्र, नीतिशास्त्र, युद्धशास्त्र आणि धर्मशास्त्राचं शिक्षण घेतल्या. इतिहासामध्ये एका हाताने घोडा फिरवणारा एकच राजा पाहावयास मिळतो तो राजा म्हणजे राजा छत्रपती संभाजी राजे हे होत. तर काही क्षणांमध्ये घोड्याला दोन पायांवर उभं करणारी तेजस्विनी पाहावयाला मिळते ती म्हणजे फक्त आणि फक्त अहिल्याबाई होळकर याच होत. त्यांची न्याय व्यवस्था निरपेक्ष व तटस्थ होती, असे हे म्हणाले
या दूरदृश्य प्रणाली द्वारे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय चर्चासत्राचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय संयोजक डॉ. पांडुरंग चिलगर यांनी करून दिला तर सूत्रसंचालन प्रो. डॉ. मारोती कसाब यांनी व आभार उपप्राचार्य तथा आयक्यूएसीचे समन्वयक प्रो.डॉ. दुर्गादास चौधरी यांनी मानले. या चर्चासत्राला ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे, प्रा.डॉ. प्रशांत बिरादार, प्रा.डॉ. सचिन गर्जे, प्रा. डॉ. किरण गुट्टे यांनी तंत्रसाह्य केले. या राष्ट्रीय चर्चासत्रासाठी प्राचार्य डॉ. महेश बेटकर, प्राचार्य डॉ. सदाशिव सरकटे शिवाजी नगर गढी , प्रा. डॉ. दिलीप सावंत, प्रा. डॉ. विठ्ठल डुमनर, प्रा.डॉ. विठ्ठल जंबाले, प्रा. कृष्णा जोंधळे, विजेंद्र चौधरी, सत्येंद्र चौधरी, प्रा. डॉ. रामचंद्र पस्तापुरे, प्रा. डॉ. परमेश्वर लोहकरे, प्रा . डॉ. गौंड, रामेश्वर केसाळे, प्रा. डॉ. म.ई. तंगावार, ग्रंथपाल अजित रंगदळ, डॉ. ननावरे , डॉ. जावळे ,गंगाराम सुरनर , मंगेश पोले , राजीव वाघमारे, कवी संतोष चमकुरे , प्रताप सूर्यवंशी, रणजीत मोरे, डॉ. सुरेश शिंदे, राजू सरवदे, प्रा. डॉ. वसंत मोटेगावकर, संतोष जुबरे, प्रा. डॉ. बालाजी श्रीगिरे, प्राचार्य डॉ. श्रीधर कोल्हे , महेंद्र कांबळे, सुरेखाताई कसाब , रामेश्वर हाडोळीकर, आनंद देवकते यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी तसेच विद्यार्थी व महाराष्ट्रासहित देशभरातून संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!