संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे 12 विद्यार्थी अखिल भारतीय सैनिक स्कूल साठी पात्र
संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे 12 विद्यार्थी अखिल भारतीय सैनिक स्कूल साठी पात्र
अहमदपूर (गोविंद काळे) : दिनांक 5 एप्रिल 2025 रोजी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या वतीने घेण्यात आलेल्या अखिल भारतीय सैनिक स्कूल प्रवेश पूर्व परीक्षेत संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयाच्या 12 विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे.
देशपातळीवरील या स्पर्धा परीक्षेत श्रेयस अमोल देशमुख याने 300 पैकी 275 गुण घेऊन विद्यालयात प्रथम आला आहे तर अभिजीत गोविंद चाटे 274 गुण घेऊन द्वितीय आला आहे. पियुष मुंडे 241, अस्मिता तांदळे 236, पार्थ किरडे 233, सुदर्शन घोगरे 223, वरद ढगे 211,राजवीर मुंडे 205, वैदेही तांदळे 205, आदित्य झेरीकुंटे 201, पार्थ बोंडगे 192 श्रावस्ती ससाने 175 गुण घेऊन हे 12 विद्यार्थी सातारा सैनिक स्कूलच्या प्रवेशासाठी पात्र झाले आहेत. या परीक्षेला देशभरातील तीन लाख विद्यार्थी बसले होते. शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
सदरील विद्यार्थ्यांना सविता पाटील, शारदा तिरुके, त्रिगुणा मोरगे, सविता करंडे यांनी मार्गदर्शन केले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष गणेश दादा हाके, सचिव प्राचार्या रेखाताई हाके-तरडे, उपाध्यक्ष एडवोकेट मानसी हाके प्राथमिक मुख्याध्यापक आशा रोडगे, माध्यमिक मुख्याध्यापिका मीना तोवर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन व केले आहे.
