शंभर दिवसात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कार्यालय प्रमुखांचा सहकार मंत्र्याच्या हस्ते गौरव सोहळा !

शंभर दिवसात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कार्यालय प्रमुखांचा सहकार मंत्र्याच्या हस्ते गौरव सोहळा !
अहमदपूर (गोविंद काळे) : उपविभागात शासकीय कार्यालयाने मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी राबवलेला १०० दिवसाच्या कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीमेमध्ये उत्कृष्ठ कार्य केलेल्या कार्यालय प्रमुखांचा महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते गौरव सोहळ्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्य यांनी राबवलेला शंभर दिवस कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला आहे. यावेळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांच्या संदर्भात तात्काळ पंचनामे करण्याच्या आदेश दिले. या शंभर दिवसांच्या कालावधीत, राज्यातील कार्यालयामध्ये सुधारणा आणणे, विकासाचे नवे मार्ग शोधून काढणे आणि जनतेसाठी सेवा सुविधा पुरवण्यावर मुख्य लक्ष केंद्रित करण्यात आले होते
१०० दिवसाच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कार्यालय प्रमुखाचा उपविभागीय स्तरावर गौरव करण्यात आला. या विशेष मोहीमेमध्ये कार्यालयीन प्रक्रिया सुधारण्यासाठी, कार्यप्रवाह अधिक चांगला करण्यासाठी आणि जनतेला उत्कृष्ट सेवा देण्यासाठी एकत्रितपणे काम करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. सदर मोहीमेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आणि त्यांच्या नवनवीन कल्पना आणि कार्यपद्धतींमुळे कार्यालयीन कार्यक्षमता वाढली आहे.
अहमदपूर’ उपविभागांतर्गत तहसिल कार्यालय चाकूर – तृत्तीय क्रमांक, उपकोषागार कार्यालय अहमदपूर – व्दितीय क्रमांक, दुय्यम निबंधक अहमदपूर – व्दितीय क्रमांक, तालुका आरोग्य अधिकारी – व्दितीय क्रमांक या चार कार्यालयांना विभागीय स्तरावर महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी उपविभागीय जिल्हाधिकारी मंजुषा लटपटे मॅडम, प्रदेश सरचिटणीस शिवानंद हेंगणे, ता.अध्यक्ष शिवाजीराव देशमुख अधिकारी वर्ग आदींची उपस्थिती होती.