विभागीय स्टेडियमची जागा बदलू नये – अजित पाटील कव्हेकर

0
विभागीय स्टेडियमची जागा बदलू नये - अजित पाटील कव्हेकर

विभागीय स्टेडियमची जागा बदलू नये - अजित पाटील कव्हेकर

लातूर (एल पी उगिले) : तालुक्यातील कव्हा-खोपेगाव येथे विभागीय स्टेडीयमचे काम होत आहे. या विभागीय स्टेडीयमच्या कंम्पाऊंड वॉलचे काम पूर्ण होऊनही, केवळ राजकीय द्वेषातून हे विभागीय स्टेडीयम इतर ठिकाणी स्थलांतरीत करण्याचा प्रयत्न स्थानिक आमदार करीत आहेत. परंतु खेळाडूंच्या सोयीसाठी लातूरनजीक असलेल्या कव्हा-खोपेगाव येथेच विभागीय स्टेडीयम कायम ठेवून उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सदरील काम त्वरीत करण्यात यावे. अशा मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांना देण्यात आले.
यावेळी भाजपा युवा नेते तथा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, जननायक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांतराव शेळके, जननायक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष बी.टी.कदम, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब देशमुख, माजी नगरसेवक बालाजी शेळके, सुभाष अप्प्पा सुलगुडले, कव्हा गावचे उपसरपंच किशोरदादा घार, जननायक संघटनेचे लातूर तालुका कार्याध्यक्ष राजाभाऊ मुळे, जननायक युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष मारुती सूर्यवंशी, भालचंद्र दानाई, नितीन कोरे, भाजपा महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्ष सहारा शेख, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अरुणाताई कांदे, शोभाताई पाटील, जमीलभाई मिस्त्री रेणापूर पंचायत समितीचे माजी गटनेते अप्पासाहेब पाटील, महादेवराव गायकवाड, शिवराम कदम, उध्दवराव जाधव, शाहूराज शिंदे, विरभद्र चिकटे, जाजू शेठ, केदार पाटील, मंजूरखाँ पठाण, रसूल पठाण, राजेसाहेब देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना अजित पाटील कव्हेकर यांनी स्पष्ट केले की, विकास करण्यासाठी भरपूर संधी आहे. मात्र ते करायचे सोडून चालू असलेल्या कामात खोडा घालणे आणि नवीन ठिकाणी विभागीय स्टेडियम घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणे, हे हास्यास्पद आहे. हे तात्काळ थांबवावे, आणि ज्या ठिकाणी काम चालू आहे. त्याच ठिकाणी विभागीय स्टेडियम व्हावे, हे खेळाडूंच्याही हिताचे आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!