महाराष्ट्र उदयगिरीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी

महाराष्ट्र उदयगिरीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी
उदगीर (प्रतिनिधी) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची 142 वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, दिनविशेष समितीचे प्रमुख प्रा. डॉ. जी. जी. जेवळीकर, प्रा. डॉ. व्ही. एस. नागपूर्णे, प्रा. डॉ. बी. एस. भूक्तरे, ग्रंथपाल डॉ. एल. बी. पेन्सलवार, स्टाफ सेक्रेटरी एस. टी. कांबळे तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.