वैष्णवी हगवणे प्रकरणी दोषींना कठोर शिक्षा द्या – मागणी

0
वैष्णवी हगवणे प्रकरणी दोषींना कठोर शिक्षा द्या - मागणी

वैष्णवी हगवणे प्रकरणी दोषींना कठोर शिक्षा द्या - मागणी

उदगीर (एल पी उगिले) : पुणे जिल्ह्यातील वैष्णवी हगवणे या महिलेस हुंड्याच्या रकमेसाठी छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत केले याप्रकरणी दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन बहुजन विकास अभियानच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यातील वैष्णवी हगवणे या महिलेचा हुंडाबळीसाठी छळ करून हत्या करण्यात आली आहे. म्हणून हे प्रकरण आता चौकशी करून, कारवाई करावी. या महिलेच्या अंगावर मारलेले व्रण आहेत.हे शव विच्छेदन
रिपोर्ट मधून उघडे झाले आहे. महाराष्ट्रात हुंडाबळीचे जवळपास 28000 प्रकरणे राज्य महिला आयोगाकडे प्रलंबित आहेत. म्हणून 24 तास काम करणाऱ्या राज्य महिला आयोगाचे अध्यक्षाकडे वैष्णवी जाऊ शकणार नाही. त्यासाठी कायदे करावेत, फरार असलेल्या आरोपीला देखील तात्काळ अटक करून, आरोपी कुटुंब हगवणे यांना ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले, त्यांच्यावर देखील कारवाईची मागणी करण्यात आली आहे. यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार, मानसिंग पवार, राजेश्वर भाटे, रवी डोंगरे, अमोल सूर्यवंशी, गोरख वाघमारे, शेख महबूब, शिवाजी करकाळे, यावर खान, राजू होळकर, बाबुराव चांदेगावकर, प्रशांत पाटील, अक्षय सावंत, रवी पुदाले, प्रकाश कांबळे, मदन पाटील, गंगाधर शेवाळे यांच्यासह बहुजन विकास अभियानच्या सदस्य असलेल्या महिला आणि समाजसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!