बकरी ईद निमित्त ईदगाह मैदानाची साफ सफाईसह स्वच्छता मोहीम राबवण्याची जन परिवर्तन सेवा संघाची मागणी

0
बकरी ईद निमित्त ईदगाह मैदानाची साफ सफाईसह स्वच्छता मोहीम राबवण्याची जन परिवर्तन सेवा संघाची मागणी

बकरी ईद निमित्त ईदगाह मैदानाची साफ सफाईसह स्वच्छता मोहीम राबवण्याची जन परिवर्तन सेवा संघाची मागणी

उदगीर (एल पी उगीले) : उदगीर शहरात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासनाने स्वच्छता मोहीम राबवून ईदगाह मैदानावर पावसामुळे चिखल झालेल्या त्या ठिकाणी सीलकोट टाकून सहकार्य करावे. यासह विविध मागण्यांचे निवेदन जनपरिवर्तन सेवा संघाच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय तसेच उदगीर नगरपालिकेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांना देण्यात आले आहे. अवकाळी पावसामुळे शहरातील विविध भागात व विशेषतः अल्पसंख्याक बहुल भागात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे.
बकरी ईद निमित्त नगरपालिका प्रशासनाने स्वच्छता मोहीम राबउन सहकार्य करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर जन परिवर्तन सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष व संपादक अझरोद्दीन शमशोद्दीन शेख,अभिजीत पाटील, सय्यद अस्लम, पठाण खाजा, पटेल फय्याज, गौस शेख, जुबेर सय्यद, अकबर शेख,आमेर पठाण,फय्याज शेख, इम्रान शेख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!